
महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपिक संवर्ग हक्क परिषदेने आपल्या खालील मागण्या तसेच जुनी पेन्शन लागू करण्याकरिता 02 ऑक्टोबर २०२२ रोजी पुकारलेल्या सत्याग्रह आंदोलनाच्या अनुषंगाने मा. बच्चू भाऊ कडू, माजी राज्यमंत्री यांनी मा. मुख्यमंत्री महोदयांसोबत लिपीकांच्या मागण्या संदर्भात सकारात्मक चर्चा केली. त्यावर मा.मुख्यमंत्री महोदयांनी लिपीकांच्या प्रश्नावर बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्यात येथील असे अश्वासन दिले आहे. या अश्वासानाची पुर्तता करण्यासाठी मा. बच्चू भाऊ कडू, माजी राज्यमंत्री यांनी लेखी पत्र देऊन लवकरात लवकर बैठक घेण्याकरीता विनंती केले आहे.दिनांक 02 ऑक्टोबर २०२२ च्या सत्याग्रह आंदोलनात इतर विभागाच्या लिपीकसंवर्गीय संघटनांन प्रमाणेच महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीक वर्गीय संघटना देखील प्रत्याक्षात सहभागी होत असल्यामुळे या संघटनेच्या पदाधिका-यांनी माननीय ग्राम विकास मंत्री यांनाही निवेदन देऊन चर्चा केली. माननीय ग्राम विकास मंत्री यांनी सुध्दा लिपीक हक्क परिषेदने पुकारलेल्या आंदोलानची दखल घेऊन लिपीक संवर्गाचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील असे लेखी आश्वासन दिले. या सर्व घडामोडी पाहता शासनाने आपल्या आंदोलानाची घेतलेली दखल विचारात घेता. दिनांक 02 ऑक्टोबर २०२२ रोजीचे सत्याग्रह आंदोलन संघटनेच्या पुढील आदेशा पर्यंत स्थगीत करण्यात येत आहे. जर शासनाने आश्वासनाची वेळेत पुर्तता न केल्यास हे आंदोलन मंत्रालयावर धडकेल याची कृपया शासनाने नोंद घ्यावी.
