पाथर्डीच्या मुकबधीर विद्यालयात जागतिक कर्णबधिर सप्ताहा निमित्त गायकवाड परीवाराच्या वतीने अन्नदान!

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर) जागतिक कर्णबधिर सप्ताहाचे औचित्य साधून श्री क्षेत्र हनुमान टाकळी येथील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल गायकवाड, आणि मुकुंद गायकवाड यांनी आपले दिवंगत वडील स्व.आसाराम राधाकृष्ण गायकवाड यांच्या स्मृती प्रित्यर्थ निवासी मूकबधिर आणि कर्णबधिर शालेय विद्यार्थ्यांना प्रिती भोजन देउन सामाजिक बांधिलकी जपली.पाथर्डी येथील निवासी मुकबधीर विद्यालयात जागतिक स्तरावर कर्णबधिर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अहमदनगर जिल्हा अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे सामाजिक कार्यकर्ते विष्णुपंत गायकवाड हे होते. मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषेत महाराष्ट्र माझा, आणि जनगणमन हे राष्ट्रगीत सादर केले. तसेच कवी बाळासाहेब कोठुळे यांनी “बाप” नावाची कविता सादर केली. शशिकांत गायकवाड, विठ्ठल गायकवाड, नवनाथ वाघ,मुख्याध्यापक प्रविण भोसले, शिक्षिका क्षिरसागर मँडम यांनी आपले विचार व्यक्त केले. संस्था चालक नंदकुमार डाळिंबकर यांनी कुटुंबात नकोशा झालेल्या मुलांना सांभाळणे किती कठीण असते हे सांगत गायकवाड परिवारातील सर्व उपस्थित सदस्यांना धंन्यवाद दिले. विद्यालयातील शिर्के सर,खोजे सर,जरे सर,वाघमारे सर,यांनी विषेश परिश्रम घेतले. योगेश गायकवाड, मुकुंद आंधळे,शिरिष गायकवाड, म्हातारदेव गायकवाड, गोरक्ष आठरे,रवी गायकवाड हे आवर्जून उपस्थित होते.आभार प्रदर्शन मुकुंद गायकवाड केले.
(विषेश प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here