श्री जोगेश्वरी देवी संस्थान व श्रीनगर गडी देवी संस्थान वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन.

0

सिलोड प्रतिनिधी. सिल्लोड तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेल्या मुंबापुरी देवीचे उपपीठ म्हणून ओळखले जाणारे श्री जोगेश्वरी देवी व माहूरगड च्या रेणुका मातेचे उपपीठ म्हणून ओळखणाऱ्या देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाची संस्थानाच्या वतीने जय्यत तयारी सुरू असून संस्थानातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने देवीच्या गडावर व मंदिर परिसरात जोरदार तयारी सुरू आहे. नवरात्र उत्सवाला येत्या 26 सप्टेंबर पासून सुरुवात होणार असून सांगता 5 ऑक्टोबरला सिमोलंगणाने (विजयादशमी) होणार आहे. दोन वर्षाच्या कोरोना काळाच्या निर्बंध मुळे देवीचे नवरात्र उत्सव या अत्यंत साधेपणाने साजरे केले जात होते मात्र यावर्षी सर्वच निर्बंध मुक्त वातावरण असल्याने नवरात्र उत्सव हा मोठ्या हर्षवल्लसाने साजरा केला जाणार असल्याचे जोगेश्वरी देवी संस्थानाचे अध्यक्ष पुंडलिक पाटील मोरे व उपाध्यक्ष कृष्णा पाटील मोरे व इंद्र गडी देवी संस्थानाचे अध्यक्ष सुरेश आप्पा गुळवे यांनी सांगितले. नवरात्र उत्सव निर्बंध मुक्त असल्यामुळे भाविकांमध्ये मोठ्या आनंदाचे वातावरण असल्याचे बघायला मिळत आहे नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जोगेश्वरी देवी संस्थान व इंद्र गडी देवी संस्थान सज्ज झाले असून मंदिर परिसरात साफसफाई व रंगरंगोटीचे कामे तसेच मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे मंदिराच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसविले आहे इंद्र गडी देवी मंदिर हे उंच डोंगर असल्यामुळे त्या ठिकाणी जाण्यासाठी पूर्ण डोंगर चढून जावे लागते.तर जोगेश्वरी देवीचे मंदिर हे पुरातन काळातील हेमाडपंती पद्धतीने दगडात कोरीव काम केलेले असून संपूर्ण मंदिर पाण्यावर उभारलेले आहे देवीच्या मंदिराजवळ एक गोड्या पाण्याचे टाके असून देवीच्या मंदिराखाली सर्वत्र पाणीच पाणी आहे मंदिरात प्रवेश केल्यावर गाभाऱ्यात दगडात कोरीव काम केलेली वाघावर अरुण असलेली अष्टभुजा देवीची आठ ते दहा फूट उंच अशी सुंदर आणि आकर्षक देवीची भव्य दिव्य मूर्ती डोळ्यांची पारणे फेडते हे दोन्ही देवस्थान जागृत असून या दोन्ही देवी भाविकांच्या नवसाला पावणारी आहे . इंद्र गडी देवीची नोव्हेंबर महिन्यात कार्तिकी पौर्णिमेला मोठी यात्रा भरते दर्शनासाठी येणारे भावीक देवीला साडी चोळी वाहून खना नारळाने ओटी भरतात वर्षभर खानदेश मराठवाडा मुंबई जळगाव धुळे या ठिकाणच्या भाविक देवीच्या दर्शनाला व नवरात्र आवर्जून हजेरी लावतात देवीच्या पूजनासाठी पैठण येथील अमेय शेवगणकर यांच्या मंत्रघोषात देवीची नऊ दिवस पूजा व अभिषेक करण्यात येणार आहे भक्तांनी देवीचे दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन जोगेश्वरी संस्थानाचे अध्यक्ष पुंडलिक पाटील मोरे उपाध्यक्ष कृष्णा बाजीराव मोरे, इंद्र गडी संस्थानाचे अध्यक्ष सुरेश आप्पा गुळवे उपाध्यक्ष रघुनाथ मोरे यांनी केले आहे.यावेळी इंद्रगडी देवी संस्थानाचा गडावर जाण्यासाठी रस्ता हा नवीन सिमेंट काँक्रीट चालू असून गाड्या पूर्ण गडावर जात नाही त्यामुळे भाविकांनी पायथ्यापासूनच पायी जाण्याचे आव्हान संस्थानाचे अध्यक्ष सुरेश आप्पा गुळवे यांनी केले आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here