अंगणवाडीताईंचे कामकाज कौतुकास्पद- नामदार भारतीताई पवार

0

नाशिक : .दिनांक १७/ ९/२०२२ रोजी जिल्हा रुग्णालय नाशिक येथे एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आरोग्य सुरक्षेची ४ वर्ष आरोग्य शिबिराचे उद्घाटन ना.डॉ.भारतीताई पवार केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारत सरकार यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी आमदार देवयानीताई फरांदे ही उपस्थित होत्या.या ठिकाणी पोषण माह २०२२ अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नासिक-२ च्या वतीने अंगणवाडीसेविका पल्लवी साळी, शितल बाविस्कर, गिरीषा खोडके ,वंदना जाधव ,सविता तायडे, किर्ती पाचपांडे ,संगीता अहिरे, हिराबाई महाले,संगीता अहिरे, मीना अहिरे, यांनी लावलेल्या पौष्टिक पाककृतींचे प्रदर्शन व स्टॉलची पाहणी करताना ना.डॉ.भारतीताई पवार केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारत सरकार व आमदार देवयानीताई फरांदे यांनी पाककृतींची चवही घेतली.सर्व सेविकाताईंच्या कामाचे कौतुक केले व ताईंनी बनवून आणलेल्या उपयुक्त अशा या पाककृतींना सोशल मिडीयाद्वारे प्रसिद्धी देण्यास सांगितले.यासाठी मुख्यसेविका सुज्ञा खरे,मयुरी महिरे यांचे मार्गदर्शन लाभले.सही पोषण-देश रोशन.🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here