
अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर ) महाराष्ट्राचे संत शिरोमणी व रामायणाचे गाढे अभ्यासक रामायणाचार्य ह.भ.प. रामराव महाराज ढोक(नागपूरकर) यांनी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील संत नरहरी पतसंस्थेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या किर्तन सोहळ्यात त्यांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. प्रारंभी सदाशिव मैड यांच्या निवासस्थानी मैड परिवाराच्या वतीने ढोक महाराज यांना सन्मानित करण्यात आले.त्यावेळी मैड परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.नंतर सिद्धिविनायक मंगल कार्यालयात संत नरहरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या तिन दिवसीय कार्यक्रमात ह.भ.प.ह.भ.प. समाधान महाराज शर्मा, ह.भ.प.राधाताई सानप,आणि शेवटी रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या किर्तनाने या सोहळ्याची महाप्रसादाने सांगता झाली. यावेळी सदाशिव मैड,सौ सुनंदा मैड,धिरज मैड,योगेश मैड,बाळासाहेब लवांडे, अण्णा साहेब लवांडे, सोमनाथ कातखडे,पोपटराव आंधळे, राहुल राजळे,अक्षय कर्डिले, कांबळे सर यांच्या सह नरहरी पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी, सिद्धिविनायक मंडळाचे सर्व कार्यकर्ते, आणि पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा)
