गणपती विसर्जन मिरवणुकी नंतरही हॉटेल चालू ठेवून पोलीसांशी हुज्जत घातली म्हणून तिसगावातील हॉटेल मालका विरुद्ध गुन्हा दाखल

0

अहमदनगर :  (अहमदनगर जिल्हा प्रतीनिधी) गणपती विसर्जन मिरवणुक शांततेत पार पाडावी म्हणून महाराष्ट्र पोलीस तासंतास रस्त्यावर उभे राहून आपला बंदोबस्त चोखपणे पार पाडीत असतात. परंतु अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथिल गणपती विसर्जन मिरवणुक शांततेत पार पाडली. पण रात्री उशिरापर्यंत हॉटेल  चालू ठेवू नयेत म्हणून अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सर्व पोलीस ठाण्यात आदेश दिले होते.त्याचे उल्लंघन झाल्याचे तिसगाव येथे दिसले म्हणून तिसगाव येथील विश्राम ग्रुहासमोरील हाँटेल मालकाला हॉटेल बंद करण्याच्या सुचना देऊन ही हॉटेल  सुरु ठेवून पोलिसांशी हुज्जत घातल्या प्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशनला तिसगाव येथील हॉटेल  मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबदची माहिती अशी की तिसगाव ता.पाथर्डी येथील विश्राम ग्रुहासमोर एक हॉटेल  आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी पाथर्डीचे पोलीस अधिकारी सरकारी वाहनातून पेट्रोलींग करीत असताना त्यांना विश्रामग्रुहा समोरचे हॉटेल  सुरू असल्याचे दिसून आले. हाँटेल बंद करण्याच्या सुचना देऊन हॉटेल  मालकाने रात्री उशिरापर्यंत हॉटेल  सुरू ठेवून “आम्ही व्यवसाय करायचा नाहीत का” असे म्हणून हुज्जत घालीत सार्वजनिक काम करीत असताना अटकाव केला म्हणून रामनाथ लक्ष्मण भुजबळ,अमोल रामनाम भुजबळ,कैलास शंकर भुजबळ,आणि नागेश शंकर भुजबळ हॉटेल मालक पिता-पुत्रासह दोघे सख्खे भाउ मिळून चौघावर गुन्हा र.नं.१०६३/२०२२ कलम१८६ प्रमाणे सरकारी पोलीस वाहन चालक पो.काँ.बक्कल नं.(३६४) किशोर पालवे यांनी गुन्हा दाखल केला आहे.तसेच शिरापूर येथील पण सध्या पुणे रेल्वे पोलीस मध्ये पो.काँ.म्हणून कार्यरत असलेल्या संतोष शिवराम बुधवंत यांच्या नावाचाही दाखल फिर्यादीत उल्लेख करण्यात आला आहे.एका व्यक्तीने हॉटेल  रात्री उशिरापर्यंत सुरू आहे म्हणून पाथर्डी पोलीस ठाण्यात फोन केला असता पो.काँ.संदिप गर्जे,भारत अंगरखे यांनी तिसगावच्या हाँटेलला भेट देऊन हॉटेल  बंद करण्याच्या सुचना देऊनही पोलिसांचे म्हणणे न ऐकल्यामुळे वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पाथर्डीचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. (प्रतिनिधी,सुनिल नजन, स्पेशल क्राईम रिपोर्टर, अहमदनगर जिल्हा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here