
ठाणे (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)
शिरवल, ता. कणकवली, जि.सिंधुदुर्ग येथील भूमिपुत्र लक्मण लाडोबा तांबे.हे गरीब कुटुंबातील गृहस्थ. पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण शिरवल नं.१ या प्राथमिक शाळेत झाले. व कणसुली येथे १०पर्यंतचे शिक्षण झाले.मुंबईत आल्यानंतर १२/९/१९८३ रोजी पोलीस दलात रुजु झाले. पोलीस दलातील प्रशिक्षण पुर्ण झाल्यावर त्यांची पहिली नेमणूक सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये झाली.कामाची आवड, सुंदर हस्ताक्षर, कायद्याचा अभ्यास, पोलीस दलातील कामाचे ज्ञान आत्मसात करत देवगड, मालवण, कणकवली, वैभववाडी अशा पोलीस स्टेशनमध्ये काम केले.मा.वरीष्ठ पोलीस अधिकारी दिवाकर सावंत यांचे योग्य मार्गदर्शन लाभल्याने लक्ष्मण तांबे यांची सन२०००मध्ये मुंबईत पोलीस उपनिरिक्षक पदावर नियुक्ती झाली.यावेळी त्यांनी सातांक्रुझ विमानतळ, तारापुर, विरार, कफपरेड, खेरवाडी, बांद्रा, नालासोपारा अशा ठीकाणी नोकरी केली. त्यानंतर २०१९ मध्ये लक्ष्मण तांबे यांची ठाणे येथील श्रीनगर पोलीस स्टेशनला वरीष्ठ पोलीस निरीक्षक म्हणुन नियुक्ती झाली. त्यांची कागदपत्रांची बांधणी, कायदा सुव्यवस्था, गंभीर आव्हानात्मक प्रकरणे,जनतेशी योग्य समन्वय राखुन सुसंवाद साधणे,वरिष्ठांच्या अंमलबजावणी करण्याची,बचावात्मक पवित्रा घेऊन उल्लेखनीय कामगिरी करण्याची असलेला शिरगावातील ढाण्या वाघ लक्ष्मण लाडोबा तांबे हे ठाणे येथील श्रीनगर पोलीस स्टेशनमधून ३१/८/२०२२तब्बल ३९ वर्षे निर्धारपूर्वक अविरत सेवा करुन सन्मानाने सेवानिवृत्त झाले. याप्रसंगी पोलीस उपायुक्त दत्ता कांबळे व वरीष्ठ पोलीस अधिकारी,अंमलदार,प्रतिष्ठित नागरिक तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेले दिलीप शिरसाट,वर्षा तांबे,राकेश पवार यांनी सेवापुर्ती सोहळ्यास उपस्थित सत्कारमुर्ती लक्ष्मण तांबे व त्यांच्या अर्धांगिनी सौ.लीना तांबे यांचा सत्कार करुन त्यांच्या उर्वरित सुदृढ आयुष्यासाठी आनंदमयी अभिनंदनपर शुभेच्छा देण्यात आल्या.
