
मनमाड : ( निलेश व्यवहारे ) शिवसेनेची बुलंद तोफ, शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख, मनमाड शहराचे माजी नगराध्यक्ष हिंदूविर स्व.राजाभाऊ छाजेड यांच्या ११ सप्टेंबर ६ व्या स्मृतीदिनानिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन केले.स्व राजाभाऊ छाजेड तुफान चोंक नूतनीकरण फलकाचे उदघाटन शिवसैनिक जाफर मिर्झा, समाज सेवक सुनीलभाऊ हांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक अमिनभाई पटेल, सुभाषभाऊ माळवतकर, वाल्मिकआप्पा आंधळे, सचिनभाऊ छाजेड, अमजदभाई मिर्झा, सिद्धार्थ छाजेड, अशोक आव्हाड, जुबेर शेख, मुकुंदभाऊ झाल्टे, लोकेशभाऊ साबळे, कयामभाई सय्यद, युवराजभाऊ छाजेड, अज्जूभाई शेख, महेंद्रभाऊ गरुड, सचिनभाऊ दरगुडे, सुनीलभाऊ ताठे, कलश पाटेकर, अजयभाऊ धात्रक, विजुभाऊ सांगळे, सुधीरभाऊ गांगुर्डे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन स्व राजाभाऊ छाजेड तुफान चोंक शाखाप्रमुख वाल्मिक भालेराव, शुभम जयस्वाल, विनोद साबळे, शेहजाद मिर्झा, झहीर सय्यद, अनिल पगारे, जितू जयस्वाल, मनोज शिंदे, प्रवीण वाघ, स्टीफन साळवे, विकास शर्मा, रोहित शर्मा आदी शिवसैनिकांनी केले.
