
मनमाड : शहरात उत्साहाने सुरु असलेल्या गणेशउत्सवाच्या पार्श्वभुमीवर रोटरी क्लब मनमाड तर्फे मनमाड माधिल विविध गणेश मंडळांमध्ये दररोज निर्माण होणारे निर्माल्य संकलन करण्यास प्रोत्साहन करण्यात आले. तसेच संकलन करण्याची व्यवस्था करुन देण्यात आली. सदरील उपक्रमाचे सर्वच गणेश मंडळांकडुन स्वागत करण्यात आले.मनमाड शहरात स्वच्छ भारत अभियाना अंर्तगत विविध कार्यक्रम घेण्याचा मानस रोटरी क्लब चे अध्यक्ष रोटे. इंजी.स्वप्निल सुर्यवंशी यांनी सांगीतला. ह्याप्रसंगी रोटरी क्लब चे सेक्रेटेरी रोटे.डॉ. सुमित शर्मा, रोटे.सुभाष गुज़राथी सर, रोटे.अनिल काकडे, रोटे. आनंद काकडे, रोटे.देवराम सदगिर, रोटे. कौशल शर्मा, रोटे. पोपट बोरसे आदि. उपस्थित होते.
