स्प्राऊट्स’ च्या दणक्याने पोलीस ऍक्शन मोडमध्ये – मुंबईच्या दारुखाना सेक्स स्कँडलमधील ३ आरोपींना अटक

0

मुंबई : मुंबईतील दारुखान्यात सेक्स स्कँडल’ ही बातमी ‘स्प्राऊट्स’मध्ये प्रसिद्ध करण्यात आली. या बातमीची त्वरित दखल घेवून पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली आहे. याशिवाय मास्टरमाईंड सह इतर ५ ते ६ फरार आरोपींचाही शोध घेण्यासाठी पावले उचललेली आहेत.मुंबईतील दारूखाना परिसरात ४० ते ५० कुटुंबातील महिलांचे नग्न स्वरूपाचे चित्रण करण्यात आले. या माध्यमातून त्यांना ब्लॅकमेलिंग केले जाते व यातूनच नवे सेक्स स्कँडल निर्माण झाले आहे. अशी बातमी बुधवारी ‘स्प्राऊट्स’मध्ये प्रकाशित करण्यात आली. त्यामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. मुंबई पोलिसांनी त्वरित कारवाईचे आदेश दिले. त्यामुळे आतापर्यंत संशयित नराधमांनी ‘मॅनेज’ केलेले शिवडी पोलीस स्टेशन त्वरित जागे झाले.इतके दिवस तक्रार घेण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांनी तातडीने पीडित महिलांच्या तक्रारी घेतल्या. इतकेच नव्हे तर सतीश हरिजन, स्टीफन नाडर, सरवना तंगराज Satish Harijan (29), Stephen Nadar (21) and Sarvana Harijan (23) या ३ आरोपींना त्वरित अटकही केली. त्यांच्यावर गु. र. क्र. ४६७/ २०२२, कलम ३५४ ( क ) २९२, ३४, भारतीय दंड संविधान सह कलम ६६ ( इ ) व ६७ (अ ) माहिती – तंत्रज्ञान कायद्यान्वये त्वरित गुन्हा दाखल करण्यात आला. इतकेच नव्हे तर याविषयीची माहिती देण्यासाठी प्रेस कॉन्फरन्सही घेण्यात आली.पोलिसांनी अटक केलेले सर्व आरोपी शिवडी पोलीस ठाणे परिसरात राहणारे आहेत. या प्रकरणातील फरार आरोपींना पोलिसांनी त्वरित अटक न केल्यास ते पुरावे नष्ट करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इतकेच नव्हे या प्रकरणातील आरोपींचे नातेवाईक अद्यापही पीडित महिलांना तक्रार न करण्याविषयी दबाव टाकत आहेत, असा आरोपही काही पीडित महिलांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ‘स्प्राऊट्स’शी बोलताना केला आहे.या सेक्स स्कॅण्डलच्या तपासातील शिवडी पोलिसांची भूमिका ही संशयास्पद होती, असा आरोप स्प्राऊट्सच्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमने पीडित महिलांच्या वतीने केला होता. या आरोपाची त्वरित दखल घेण्यात आली व हा तपास आता ‘येलो गेट’ पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आला आहे. याशिवाय गुन्हे शाखा व सोशल सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाला भेट दिली व त्याचा प्राथमिक रिपोर्ट वरिष्ठांना सादर केला.जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ सहकार्य:उन्मेष गुजराथी,स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here