आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांना अंशतः अनुदानित शाळांना शंभर टक्के अनुदान मिळावे याबाबत निवेदन

0

वासोळ ( पत्रकार प्रशांत गिरासे नाशिक) सुरगाणा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आदिवासी सेवक चिंतामण गावित यांनी आदिवासी उपयोजन क्षेत्रातील अंशतःशाळांना शंभर टक्के अनुदान मिळावे यासाठी आदिवासी विकास मंत्री माननीय श्री विजयकुमार गावित साहेब यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
राज्य शासनाच्या वतीने राज्यातील कायम विनाअनुदानित शाळांना अंशतः अनुदानित करण्यात आले असून गेल्या पाच सहा वर्षांपासून या शाळांमध्ये अध्यापनाचे काम करणारे शिक्षक व कर्मचारी अल्पशा पगारात आपले जीवन जगत आहेत. दुर्गम अति दुर्गम अशा वाड्या वस्त्यांमध्ये ही शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करीत असून त्यांचेच संसार अंधारात असल्याने हे लोक हालाखीचे जीवन जगत आहेत. अशा आदिवासी व अतिदुर्गम भागातील शाळेतील शिक्षकांना शंभर टक्के अनुदान शासनाच्या वतीने देण्यात यावे या मागणीसाठी श्री चिंतामण गावित साहेब यांनी ना गावीतसाहेब यांची भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी त्यांच्यासोबत रणजित गावित, राजेंद्र गावित, मधुकर चौरे, दिनकर निकम, सीताराम पवार, ललित आहेर, शरदचंद्र काकुस्ते आदींसह आदिवासी भागात काम करणारे अंशतः अनुदानित शिक्षक उपस्थित होते. माननीय विजयकुमार गावित साहेब यांनी 100% अनुदान लवकरच माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी बातचीत करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here