
सिल्लोड ( प्रतिनिधी विनोद हिंगमिरे) श्री क्षेत्र मुर्डेश्वर संस्थान केळगाव येथे प. पू ब्रह्मगिरी बालयोगी काशीगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने सालाबाद प्रमाणे यावर्षी
विपुल पर्जन्यवृष्टी जनकल्याण साठी महारुद्रअभिषेक व महाप्रसादाचे आयोजन भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले होते त्यानिमित्त ८० ते ९० हजार भाविकांनी भगवान मुर्डेश्वर दर्शन घेऊन लाभ घेतला. महाप्रसादाचा लाभ घेतला 10 ते 12 वर्षापासून भारतीय जनता पार्टी सिल्लोड यांच्यावर वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.
तरी यावर्षी भारतीय जनता पार्टीच्या वतीने भंडाऱ्याचे आयोजन केले होते. प. पु. काशीगिरी महाराजांना भारतीय जनता पार्टीने वचन दिले होते. यापुढे अशाच भंडाऱ्याचा आम्ही आयोजन करणार असे सध्याचे पिठाधीश सरवानंद सरस्वती यांना सुद्धा वचन दिले.
यानिमित्त मा.उप सभापती अशोक दादा गरुड, सुरेश दादा बनकर, ज्ञानेश्वर मोरे, इंद्रीस मुलतानी, दाणेकर काका, सुनील मिरकर, विकास पा.मुळे,बाळू जाधव, शेषराव पा. जाधव, अंकुशशेठ कोठाले, बाळू जाधव, राजूअप्पा हिंगमीरे, विनायक सनासे,K. T.कोल्हे,रमेश गायकवाड व आधी सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले व भंडाराचे कार्यक्रम पार पडला.यानिमित्त सिल्लोड पोलीस स्टेशनचे पीएसआय आडे साहेब तसेच अमाठाणा जमादार जोशी साहेब व तंटामुक्ती अध्यक्ष सर्जेराव पवार पो पा. बाळू पा. इवरे आदीने परिश्रम घेतले तसे सिल्लोड बस आगाराच्या वतीने जादा बसेस सोडण्यात आले होत्या.
