
नाशिक : हिंदूहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे विद्याप्रबोधिनी मनपा शाळा क्र. ७१, रायगड चौक सिडको नाशिक येथे दहीहंडी महोत्सव संपन्न कोरोना कालावधीत अनेक निर्बंध असल्याने विद्यार्थी देखील गेल्या दोन-तीन वर्षांपासून विविध उत्सव, उपक्रम यांपासून वंचित राहिले. पर्यायाने विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजण पडले होते. यावर्षी निर्बंध हटताच शाळेने विद्यार्थ्यांना आनंद मिळावा म्हणून भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते यांनी सांगितले यावेळी शाळेतील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी राधा कृष्णाची आकर्षक वेशभूषा केली होती. दहिहंडिचे पूजन मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते यांनी केले. गोविंदा रे गोविंदा यासारख्या कृष्णगीतांवर शाळेतील मुलांनी तसेच शिक्षकांनी मनसोक्त नाचण्याचा आनंद लुटला. यावेळी शाळेतील सर्व शिक्षकांनी मुलात मुल होऊन विद्यार्थ्यांना जो आनंद दिला तो खरोखरच वाखाणण्याजोगा होता. दहिहंडी फोडण्यासाठी विद्यार्थ्यांच्या विविध पथकांनी थर रचत दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला. सरतेशेवटी शाळेतील राधेश्याम गटाने यशस्वीपणे थर रचत दहिहंडी फोडण्याचा मान मिळवला आणि सर्व विद्यार्थ्यांनी आनंदाने एकच जल्लोष केला. तद्नंतर विद्यार्थ्यांना दहीहंडी महोत्सवाचा प्रसाद वाटण्यात आला. दहिहंडी महोत्सवाचे नियोजन मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ शिक्षिका शोभा मगर, प्रमिला देवरे, रुपाली ठोक, सुनिता धांडे, योगिता खैरे, किसन काळे, विनोद मेणे, सुवर्णा थोरात, शैलजा भागवत, किर्तीमाला भोळे, वर्षा सुंठवाल, प्रविण गायकवाड यांनी केले. दहीहंडी महोत्सवासाठी बहुसंख्य पालक उपस्थित होते. उपस्थित पालकांनी शाळेच्या या उपक्रमाचे तोंडभरुन कौतुक केले.
