
मुंबई (प्रतिनिधी) – मुंबई येथून प्रसिद्ध होणारे ” साप्ताहिक मुंबई रिपोर्टर ” ह्या साप्ताहिकाचे उपसंपादक अरविंद कोंडीबा बनसोडे व त्यांचे सहकारी शंकर काशीद यांनी भाजपा शिवसेना युतीचे अल्पसंख्यांक खात्याचे कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार साहेब यांची त्यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी त्यांना शुभेच्छा देताना पुष्पगुच्छ व साप्ताहिक मुंबई रिपोर्टरची एक प्रत त्यांना सप्रेम भेट दिली. साप्ताहिक मुंबई रिपोर्टर एक मुंबईतील नावाजलेले साप्ताहिक वृत्तपत्र आहे. समाजाच्या हितासाठी बातम्या देण्यात हे वृत्तपत्र अग्रेसर आहे. अतिशय गाजत असलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रातर्फे उपसंपादक अरविंद बनसोडे यांनी कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार साहेब यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. साहेब तुम्ही अल्प संख्यांक समाजाच्या हितासाठी जो निर्णय घ्याल व समाजासाठी चांगले काम कराल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.
