
मनमाड : गुरुवार ११ ऑगस्ट २०२२
रोटरी क्लब मनमाड तर्फे मनमाड मधिल ३५ अंगणवाडी सेविकेना ” हर घर तिरंग़ा ” कार्यक्रमा अंतर्गत तिरंग़ा वाटप करण्यात आले. तसेच तिरंगा लावण्या संबंधीच्या शासनाचे नियमांचे पालन करुन स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यास प्रोत्साहित केले. अंगणवाडी सेविकांनी रक्षाबंधनाचे औचित्य साधुन उपस्थित रोटेरीयन यांचे राखी बांधुन औक्षण केले.रोटरी क्लब च्या प्रोजेक्टची माहीती प्रेसिडेंट इंजी.स्वप्निल सुर्यवंशी यांनी दिली. महिला रोटरी क्लब ने सर्व आयोजन केले.ह्याप्रसंगी रोटरी क्लब चे अध्यक्ष इंजी. स्वप्निल सूर्यवंशी, सेक्रेटरी डॉ. सुमित शर्मा, रोटे.सुभाष गुजराती सर, रोटे. गुरजीत कांत ,रोटे.देवराम सदगिर, रोटे.दिनेश बेदमुथा, रोटरी महिला क्लब प्रेसिडेंट सौ.सेनोरीता सुर्यवंशी, सेक्रेटरी सौ.निधी शर्मा, सौ.कांत, सौ.रक्षा बेदमुथा,सौ.सुलभा सदगीर, सौ.मयुरी काकडे, एकूण ७० अंगणवाडी सेविका व मदतनिस, केंद्र प्रमुख सौ.अन्नपुर्णा अडसुळे मॅडम आदी. उपस्थित होते.
