भारत देशाच्या 75 व्या अमृत महोत्सवा निमित्त शिवनेरी सेवा मंडळ आयोजित विविध स्पर्धांचे आयोजन.

0

मुंबई- (शिंदेवाडी-दादर प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे)
शिवनेरी कट्टा या कार्यक्रमाची संकल्पना श्री. जनाद॔न सोनवडेकर यांची आहे. या कार्यक्रमाअंतर्गत सर्व वयोगटातील हौशी कलावंत पुरूष, महिला, मुले यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी शिवनेरी कट्टा या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी हे प्रयोजन. या मध्ये गायन, हास्य विनोद, स्टॅंडअप काॅमेडी, नाट्य वाचन, कविता वाचन, एकपात्री अभिनय, नृत्य, वक्तृत्व, वादन कौशल्य, या संबंधित कलागुण सादर करण्याची संधी आहे. अधिक माहिती साठी संपर्क
जनार्दन सोनवडेकर (सांस्कृतिक विभाग प्रमुख)
9867632489 ,संजय माजरेकर (कार्यकारणी सदस्य) 9967833433,विलास पेडणेकर (उपाध्यक्ष) 9870177397
सुनील कांबळी (कार्यकारणी सदस्य) 9820222635, प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य असून सदर कार्यक्रमाच्या सादरीकरणास परिक्षकाच्या अनुमतिने निवडण्यात येणा-या सादर कर्त्यास विशेष पुरस्काराने गौरवण्यात येईल .तसेच सर्व सहभागींना प्रमाण पत्र देण्यात येईल. हा कार्यक्रम भारताच्या 75व्या (अमृत महोत्सवी) वर्षा निमित्ताने आयोजित केला आहे. हा कार्यक्रम ऑगस्ट 2022 मध्ये दादर शिंदेवाडी येथे होणार असुन प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2022 आहे. अशी माहिती मंडळाचे प्रमुख कार्यवाह नितीन यशवंत पेडणेकर यांनी दिली आहे. ( धन्यवाद, महेश्वर तेटांबे, दिग्दर्शक,पत्रकार,8879810298)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here