सभी का खून शामिल है यहा की मिट्टी मे! येवला येथील कार्यक्रमात समतादूत चंद्रकांत इंगळे यांचे प्रतिपादन.

0

येवला : आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान (उमेद ), पंचायत समिती येवला, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)पुणे यांचा समतादूत प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष गट विकास अधिकारी अन्सार शेख, सहाय्यक प्रशासन अधिकारी शाम साळूंखे,विस्तार अधिकारी भगवान बच्छाव, स्टेट बँक ,बँक ऑफ इंडिया,बँक ऑफ महाराष्ट्र येवला शाखांचे मॅनेजर, नायब तहसीलदार,तालूका अभियान व्यवस्थापक दीपिका जैन,तालूका व्यवस्थापक दीपक आढागळे, समतादूत चंद्रकांत इंगळे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.मान्यवरांच्या स्वागत सत्कारानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र ग्रामीण जिवानोन्नती अभियानामार्फत तालुकास्तरीय स्वयं सहायता महिला समूहांना कर्ज वाटप कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी 17 बचत गटांना 41लक्ष,26महिलांना cmegp अंतर्गत 26लक्ष कर्ज वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास उपस्थित व्याख्याते, समतादूत चंद्रकांत इंगळे यांनी ‘राहत इंदोरी’ यांच्या शायरीचा उल्लेख करत हा देश उभा राहताना सर्वच जाती,धर्माच्या क्रांतिकारकांनी, महापुरुषांनी हा देश उभा केला. देश कुण्या एकाची जहागीर नाही तो साऱ्यांचा आहे. या संदर्भाने आपल्या व्याख्यानातून देशाच्या जडण घडणीत क्रांतिकारकांचे, महापुरुषांचे, स्वातंत्र्य सैनिकांचे कसे योगदान आहे ते प्रतिपादित केले. उमेद अभियानाच्या कर्ज प्राप्त भगिनींना उद्योग उभा करण्यासाठी मानाच्या पातळीवर काय करावे लागेल याबाबत मंत्रमुग्ध करणारे मार्गदर्शन केले.यावेळी विविध बँकाचे शाखा व्यवस्थापकांनी कर्ज परतफेड, सीएमइजिपी योजना,बिमा या बाबत मार्गदर्शन केले. विस्तार अधीकारी भगवान बच्छाव यांनी शासनाच्या घर घर तिरंगा उपक्रमाची व आचार सहिंता याबाबत मार्गदर्शन केले.नायब तहसीलदार साहेब यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष गट विकास अधिकारी अन्सार शेख यांनी उमेद अभियानाचा उद्देश, गरज, स्वयंविकास याबाबत आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन,नियोजन सूत्रसंचालन तालूका व्यवस्थापक राहुल आढागळे,तालूका अभियान व्यवस्थापक दीपिका जैन यांनी केले.कार्यक्रमाला उमेद अभियानाच्या स्वयंसाहायता युवा गटाचे गट समन्व्यक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here