महाराष्ट्राच्या मंत्री मंडळात आठरा मंत्र्यांचा शफथविधी संपन्न, राम शिंदे आणि गोपीचंद पडळकरांना डावलल्याने,धनगर समाजात प्रचंड आक्रोश व असंतोष

0

अहमदनगर : (सुनिल नजन /अहमदनगर) महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ झाल्या नंतर एक महिन्याच्या प्रदीर्घ प्रतिक्षेच्या कालावधी नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्री मंडळात भाजपच्या ९ आणि शिवसेनेच्या बंडखोरी करत बाजूला गेलेल्या शिंदे गटातील ९ आमदारांनी कँबीनेट मंत्री म्हणून आज ९आँगष्ट २०२२ रोजी गोपनीयतेची शफत घेतली.शफत घेन्याचा पहिला मान अहमदनगर जिल्ह्याचे भाग्यविधाते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांना मिळाला.नंतर ना.सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांतदादा पाटील,विजयकुमार गावित, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, दादा भुसे,संजय राठोड, सुरेश खाडे,संदिपान भुमरे,उदय सामंत, तानाजी सावंत,रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार,दीपक केसरकर, अतुल सावे,शंभूराज देसाई, आणि मंगलप्रभात लोढा या आठरा आमदारांनी मंत्री पदाची शफत घेतली या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले, राज्यपाल, भगतसिंग कोश्यारी यांच्या सह अनेक आमदार उपस्थित होते. धनगर समाजाचे नेते आमदार राम शिंदे आणि आमदार गोपिचंद पडळकरांना मंत्री पद न मिळाल्याने धनगर समाजात या सरकार विरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. निवडणूक काळातील भाषणात ना.फडनविस यांनी राम शिंदेना पुन्हा मंत्री पद देणार ही घोषणा हवेतच विरली असल्याचे दिसून आले.(प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here