सिल्लोड ( प्रतिनिधी विनोद हिंगमिरे) सिल्लोड तालुक्यातील सावखेडा वाडी ता.सिल्लोड परिसरात दिनांक 11 जून दुपारी 12 वा.दरम्यान जोरदार विजांच्या कडकडाटासह पाऊसाला सुरुवात झाली ,व याचवेळी आपल्या शेतात काम असलेल्या सावखेडा वाडी ता.सिल्लोड येथील तरुण शेतकरी संजय नथू उटाडे वय 45 वर्ष यांचे 1:20 वाजता सुमारास अंगावर वीज पडून गंभीर जखमी झाले,व त्यांना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड येथे नेले असता त्यांना डॉक्टरानी तपासून मृत घोषित केले. नंतर उशिरापर्यंत शवविच्छेदन चालू होते.