नांदगाव विधानसभा मतदार संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच जनतेचे लाडके आमदार सुहास आण्णा कांदे यांनी आमदार आपल्या दारी या धर्तीवर जनता दरबाराची आव्हान केले आणि मोठ्या अभूतपूर्व संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून प्रतिसाद

0

नांदगाव ( निलेश व्यवहारे ) विधानसभा मतदार संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच जनतेचे लाडके आमदार सुहास आण्णा कांदे यांनी आमदार आपल्या दारी या धर्तीवर जनता दरबाराची आव्हान केले आणि मोठ्या अभूतपूर्व संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून प्रतिसाद दिला.

आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून आमदार आपल्या दारी या मोहिमेची सुरुवात आजपासून मनमाड मधील पूर्व भागापासून सुरुवात झाली यामध्ये गुरुकुल वाडी माऊली नगर किर्ती नगर कोतवाल नगर सिकंदर नगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर तिरंगा नगर व गौतम नगर या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आमदार सुहास अण्णा कांदे व उपस्थित सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांनी महापुरुषांची प्रतिमा पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात केली.सुमित प्लाझा बीएसएनएल ऑफिस शेजारील पटांगणावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या समस्या आमदार सुहास अण्णा कांदे यांच्यासमोर मांडल्या असता संबंधित अधिकाऱ्यांची उत्तर व आमदार साहेबांनी मध्यस्थी करून नागरिकांच्या समस्या मार्गी लावल्या तसेच समस्या निराकरण करण्याचे आश्वासन दिले.आमदार सुहास अण्णा कांदे यांचे विकास कार्य मोठ्या प्रमाणात असून मतदार संघातील प्रत्येक घराघरातील व्यक्ती आमदारांना जवळून ओळखायला लागलेला आहे अशा परिस्थितीत आमदार आपल्या दारी या माध्यमातून आपल्या घरी आमदार येत आहे या भावनेने अनेक नागरिक आमदार साहेबांना प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी कुठलीही समस्या नसताना उपस्थित होते.आमदार आपल्या दारी या कार्यक्रमात जवळपास 172 नागरिकांच्या समस्या तक्रार अर्ज दाखल झाले. नगरपालिकेच्या कर्मचारी चकोर मॅडम यांचे सेवेत असताना कोरोना मुळे निधन झाले, त्यांच्या मातोश्री यांना पन्नास लाख रुपये धनादेश आमदार सुहास अण्णा कांदे व मुख्याधिकारी सचिन पवार पटेल यांच्या हस्ते देण्यात आला नगरपालिका , महावितरण संबंधित रेशन कार्ड संबंधित नागरिकांनी समस्या मांडल्या असता संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे त्वरित आश्वासन दिले.कार्यक्रमाच्या सुरुवातीस शिवसेना तर्फे उपस्थित सर्व शासकीय अधिकाऱ्यांची फुल गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शासकीय विभागातून, माननीय तहसीलदार साहेब सिद्धार्थ मोरे मनमाड नगरपालिका मुख्याधिकारी डॉक्टर सचिन कुमार पटेल व्हिडिओ नांदगाव पंचायत समिती मनमाड पोलिस स्टेशन एपीआय श्री गीते साहेब बांधकाम खात्याचे खैरनार साहेब पवार साहेब कृषी विभाग नांदगाव तालुका आरोग्य विभागाचे डॉक्टर जगताप भूमिअभिलेख विभागाचे नितनवरे साहेब उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय तहसीलदार साहेब होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर प्रमुख महेश बोरसे यांनी केले तर सूत्रसंचालन अनिल दराडे नाना पाटील नाना पाटील यांनी केले ,कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शहर प्रमुख मयूर बोरसे जिल्हा उपप्रमुख संतोष बळीद जिल्हा संघटक राजाभाऊ भाबड जिल्हा समन्वयक भाऊ पाटील तालुका संघटक संजय कटारिया सुभाष माळवदकर गोटू केकान युवासेनेचे मुन्ना भाऊ दरगुडे अमीन पटेल अंकुश गवळी सिद्धार्थ छाजेड योगेश इमले, सचिन दरगुडे,ज्येष्ठ नेते अल्ताफ बाबा खान माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे पिंटू शिरसाठ, जाफर मिर्झा,नगरसेवक गालीब शेख विनय आहेर शहर उपप्रमुख दिनेश घुगे शहर संघटक मुराद शेख महेंद्र गरुड बबलू शेख अजू शेख प्रवीण नागरे लाला नागरे पिंटू वाघ शाखाप्रमुख कैलास सोनवणे उपविभाग प्रमुख बापू शिंत्रे शाखाप्रमुख ज्ञानेश्‍वर उगले बूथप्रमुख सूर्यभान बोरसे गटप्रमुख धर्मा पवार, इत्यादी उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here