ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा तर्फे 31मे रोजी वर्कशॉप मधून सेवानिवृत्त होत असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना चा सत्कार वर्कशॉप मधील टाईमबुध जवळ करण्यात आला.

0

मनमाड : ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा तर्फे 31मे रोजी वर्कशॉप मधून सेवानिवृत्त होत असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना चा सत्कार वर्कशॉप मधील टाईमबुध जवळ करण्यात आला.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, सहाय्यक कारखाना प्रबंधक सहारे साहेब, झोनल कार्यकारिणी सदस्य विजय भाऊ गेडाम, प्रविण भाऊ अहिरे, कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ भाऊ जोगदंड, वरिष्ठ कार्यकर्ते रविंद्रभाऊ पगारे, संजय केदारे, आदी उपस्थित होते.मनमाड वर्कशॉप मधून या महिन्यात एकूण 13कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे.
(१) सिनियर सेक्सन इंजिनिअर संजय सोनवणे,(२) वरिष्ठ कार्यालय अधीक्षक उल्हास राजपाठक ,(३) कृष्णा कचरे,(४)काळू सानप,(५) हेनरी जोसेफ फ्रान्सिस ,(६)सय्यद इकबाल अकबर,(७) सुरेश चौधरी, (८)सलीम दादेखान,(९)संजय ताठे(१०) मधुकर सदगीर(११)परबत शेळके(१२) शंकर सानप ,(१३) उत्तम पवार असे १३कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे.झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांनी आपल्या भाषणात म्हणाले”आज हे कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे, त्यांनी आपल्या कामाद्वारे मनमाड वर्कशॉप साठी भरीव योगदान दिले आहे, त्यामुळे कारखानाचे उज्ज्वल भविष्य घडवीत सेवानिवृत्त होत आहे, तरूण कामगारांनी त्यांचा आदर्श घ्यावा”
तसेच CRMS कारखाना शाखा चे महेंद्र चौथमल, सिद्धार्थ जोगदंड, पंढरीनाथ पठारे, सेवानिवृत्त होत असलेले कर्मचारी सिनियर सेक्सन इंजिनिअर संजय सोनवणे, वरिष्ठ कार्यालय अधीक्षक उल्हास राजपाठक,सलिम दादेखान, कृष्णा कचरे आदी ने भाषणे केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर साळवे यांनी केले तर आभारप्रदर्शन सिद्धार्थ जोगदंड यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन कारखाना शाखा चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव रमेश पगारे, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, उपाध्यक्ष सुभाष जगताप, बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले, सहाय्यक सचिव सुनील सोनवणे, कारखाना शाखा चे कार्यालय सचिव संदीप पगारे, संदिप धिवर, विनोद झोडपे, विनोद खरे, किरण आहीरे, हर्षद सुर्यवंशी,सचिन इंगळे, फकिरा सोनवणे,प्रभाकर निकम, संतोष सावंत, राजेंद्र सोनवणे, निखिल सोनवणे, दिपक राऊत, अर्जुन बागुल, प्रशांत मोरे,विशाल त्रिभुवन, किरण वाघ, गणेश केदारे,गणपत गायकवाड, आदी ने केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here