मनमाड : ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन अतिरिक्त मंडळ मनमाड चे उपाध्यक्ष सुभाष जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे, विजय भाऊ गेडाम, ओपन लाईन शाखा चे अध्यक्ष प्रदीप भाऊ गायकवाड, असोसिएशन कारखाना शाखा चे माजी सचिव अशोक गरुड, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले आदी उपस्थित होते.सुभाष जगताप यांचा सत्कार सतिश भाऊ केदारे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी सतिश भाऊ केदारे, शरद झोंबाड, सुभाष जगताप आदी चे भाषणे झाली यावेळी सहाय्यक सचिव सुनील सोनवणे,दिपक अस्वले, सचिन इंगळे, प्रेमदिप खडताळे, विनोद खरे, पंढरीनाथ पठारे, गणपत गायकवाड,बाळु मोरे आदी उपस्थित होते.