सिल्लोड ( प्रतिनिधी- विनोद हिंगमिरे ) सिल्लोड तालुक्यातील प्रज्ञा जागृती प्राथमिक शाळेत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली सन्मान महाराष्ट्रतील लेकीचा या कार्यक्रमा अंतर्गत प्रमुख अतिथी आमठाणा सरपंच सौ कोकिळाबाई मोरे, उपसरपंच सौ विमल लोखंडे सौ रुखमण मोरे, सौ सोनुताई खरात याच्या प्रमुख उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी मान्यवर व विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात सावित्रीबाई फुले यांचे प्रेरणादायी विचार सावित्रीबाई चे प्रगतशील व शिक्षित समाज घडविण्याचे कार्य पुढे नेणे हीच खरी काळाची गरज शिक्षणाखेरीज मसनुष्याचा विकास साधणार नाही संविधानाने महिलांसह प्रत्येक नागरिकाला समान हक्क व अधिकार प्राप्त झाले आहे आज प्रत्येक स्त्री शिक्षण घेऊन उच्च पदावर काम करीत आहे असे आपल्या मनोगतात व्यक्त केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक कुशल देशमुख, रामेश्वर गरूड, ज्ञानेश्वर गवते, सुरेश कुरकुटे, रामेश्वर सहाणे, समाधान वाघमोडे, योगेश देशमुख, विकास पगार,सुलोचना राठोड, अनुजा खोबरे, अ जर शेख,यांची उपस्थिती होती,
Home Breaking News सन्मान महाराष्टातील लेकीचा या कार्यक्रमाअंतर्गत प्रज्ञा जागृती प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले जयंती...