वासोळ: प्रतिनिधी प्रशांत गिरासे,मो.9130040024,या वर्षी करोना सारख्या साथीच्या दुसऱ्या लाटेत प्राणवायू ऑक्सिजन अभावी होणारे रुग्णांचे हाल सर्वांना दिसुन आलेआहेत त्यामुळे नैसर्गिक रीत्या प्राणवायूची निर्मिती आपण सर्वांनी जाणले आहे वातावरणातील नैसर्गिक प्राणवायूचे प्रमाण वाढविण्यासाठी वाखारी गावात एक निसर्गरम्य वातावरण तयार व्हावे म्हणून प्रथमता जेसीबीच्या साह्याने त्या ठिकाणची पूर्णपणे जागा साफ करण्यात आली व त्यानंतर खड्डे खोदून त्या खड्ड्यांमध्ये पोयटा माती टाकण्यात आली व त्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले व त्यानंतर प्रत्येक झाडाभोवती लोखंडी जाळी लावण्यात आल्या व टॅंकर च्या साह्याने संपूर्ण झाडांना पाणी टाकण्यात आले हे गावातील तरुण नागरिक श्याम पवार,शिवा जाधव,रवी गुंजाळ यांनी स्वखर्चाने हा कार्यक्रम आयोजित केला होता याप्रसंगी वाखारी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.