नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर संताप व्यक्त करून अपघात स्थळावर रस्ता रोको आंदोलन करून निषेध

0

सिल्लोड ( प्रतिनिधी -विनोद हिंगमिरे) नाचनवेल बसस्थानक ते चौफुली या दीड किलोमीटर रस्त्यावर बुधवारी झालेल्या अपघातामुळे जवखेडा बु येथील एकोणीस वर्षीय अभिषेक रावसाहेब मोरे या तरुणाचा मृत्यू झाल्याने नाचनवेल सह परिसरातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर संताप व्यक्त करून अपघात स्थळावर रस्ता रोको आंदोलन करून निषेध व्यक्त केला.फुलंब्री ते पाचोरा राज्य महामार्ग ४८ हा मराठवाड्यातून खान्देशाला जोडणारा कमी अंतराचा रस्ता आहे या रस्त्यावरून प्रचंड रहदारी असल्यामुळे वाहनांची संख्या जास्त व रस्ता अरुंद व खड्डेमय अशी अवस्था असल्यामुळे अपघाताच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. या मार्गाचे काम जलद गतीने पूर्ण करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी अनेक वेळा निवेदने देऊन केली आहे. या रस्त्याचे काम मंजूर होऊन सात ते आठ महिने झाले तरी आतापर्यंत काम सुरू झाले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहे. नाचनवेल सह परिसरातील नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी शुक्रवारी रस्ता रोको करून सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध केला आहे. येत्या आठ दिवसात प्रत्यक्ष कामास सुरुवात न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
यावेळी माजी उपसरपंच शिवाजी थोरात श्याम मोतीलाल राजपूत, रावसाहेब शिंदे, विकास राजपूत, मधुकर नाना थोरात, अमोल आहेर, मोहम्मद लतिभ पठाण, संतोष शिंदे,पाशू शहा, माणिक थोरात, दशरथ थोरात, भिकन निकम,अशोक शहा, गणेश तांबे, अजीनाथ थोरात, सह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here