मनमाड : येथील दत्त मंदिर परिसरात असणाऱ्या श्री पातालेश्वर महादेव मंदीर मध्ये दर वर्षी श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी गेल्या अनेक वर्षांपासून होत असणारा महारुद्र अभिषेक संपन्न झाला. दत्त मंदिर परिसरामध्ये पातालेश्वर महादेव मंदिरा बरोबरच संगमेश्वर महादेव मंदिर , सिद्धेश्वर महादेव मंदिर आणि अनेक देवतांची मंदिरे आहे.श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी आणि महा शिवरात्री ला भाविकांची येथील महादेव मंदिरा मध्ये मोठी गर्दी होत असते. परंतु यंदाच्या वर्षी कोरोना विषाणूच्या प्रभावामुळे भाविकांची वर्दळ कमी असुन पुजाऱ्यान द्वारे श्रावण महिण्यातील पुजा संपन्न होत आहे.
आज आपण महारुद्र अभिषेकाचे छायावृत्त पाहुया….