कळवण ( प्रतिनिधी-महेश कुवर) कळवण – मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून कळवणच्या आर के एम माध्यमिक विद्यालयात विराज प्रमोद कोतकर हा विद्यार्थी 95 टक्के गुण मिळवून प्रथम आला. हर्षद किरण पाटील या विद्यार्थ्यांने 94.80 टक्के गुण मिळवून द्वितीय तर श्रीकृष्ण संजय जाधव व प्रीती नामदेव पवार या दोघांनी 94.20 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. आर के एम माध्यमिक विद्यालयातील 314 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यात 312 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेचा निकाल 94.87 टक्के लागला असल्याची माहिती आर के एम माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एल डी पगार यांनी दिली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अँड.शशिकांत पवार, उपाध्यक्ष डॉ रावसाहेब शिंदे, सरचिटणीस बेबीलाल संचेती,प्राचार्य एल डी पगार आदींनी कौतुक केले.