नांदगाव ( प्रतिनिधी-निखिल मोरे) : कोरोना बाधित कर्मचाऱ्याच्या संपर्कात आल्याने कोरंटाईन झालेल्या नांदगाव नगरपालिकेतील १३ कर्मचाऱ्यांसह मुख्याधिकारी यांचे कोरोना चाचणी अहवाल रात्री उशिरा प्राप्त झाले असून सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने सर्वांनीच सुटकेचा निःस्वास सोडला असून गेले चार दिवसापासून कुलूपबंद असलेले नगरपालिकेच्या कार्यालयाचे निर्जंतुकीकरण करून आज सकाळपासून नियमितपणे कामकाजाला सुरुवात करण्यात आली आहेत. येवला येथे वास्तव्यास असलेले नगरपालिकेचे एक कर्मचारी रजा कालावधी संपल्यावर आपल्या कर्तव्यावर रुजू होण्यासाठी आले त्यानंतर काही तासांच्या कालावधी नंतर त्यांच्या परिवारातील एक सदस्याचा कोरोना चाचणी अहवाल बाधित आल्याने सदर कर्मचाऱ्यास मुख्याधिकारी डॉ. श्रिया देवचके यांनी त्वरित कोरंटाईन होण्यास सांगितले होते. खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेतील २३ कर्मचाऱ्यांना कोरंटाईन होण्यास सांगितले होते. दरम्यान संबंधित कर्मचारी कोरोना बाधित झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या मुख्याधिकाऱ्यासह १३ कर्मचाऱ्याचे स्त्राव बुधवारी घेऊन चाचणीसाठी पाठवण्यात आले होते सदर अहवाल गुरुवारी उशिरा रात्री प्राप्त झाले असुन सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांनीच सुटकेचा निःस्वास सोडला आहे. यानंतर सकाळी नगरपालिका कार्यालय निर्जंतुक करून चार दिवस कुलूपबंद असलेले कार्यालयाचे कामकाज पुर्ववत सुरू करण्यात आले आहेत.