Home Breaking News रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

0

मनमाड (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मनमाड येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली.या अभिवादन कार्यक्रमासाठी रिपाईचे उत्तर महाराष्ट्र कामगार तथा युवक आघाडी चे मा. वंदेशजी गांगुर्डे, ओबीसी जिल्हाध्यक्ष गोरखशेठ चौधरी, युवा नेते दीपक साळवे, कामगार आघाडी चे मनमाड शहर अध्यक्ष राजाभाऊ सावदेकर, राजेंद्र निकम, पापा शेख विलास साठे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.वंदेशजी गांगुर्डे म्हणाले की, देशाला सामाजिक क्रांतीची दिशा दाखवण्याचे कार्य महाराष्ट्रातील महापुरुषांनी केले आहे. अण्णाभाऊ साठे यांनी श्रमिक, कष्टकरी यांच्या वेदनांना हुंकार दिली. आपल्या साहित्यातून त्यांनी श्रमिकांच्या व्यथा मांडल्याचे त्यांनी सांगितले. अजय साळवे यांनी अण्णाभाऊंनी आपल्या लेखनातून कष्टकऱ्यांच्या वेदना जगा समोर आणल्या. आजही समाजात श्रमिक-कष्टकऱ्यांना न्याय मिळत नसून, न्याय-हक्कासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराने संघर्ष करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here