अहमदनगर (सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) राष्ट्र संत आचार्य परम पूज्य श्री आनंद ऋषिजी महाराज यांच्या 125 व्या जन्मोत्सव सोहळ्या निमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र चिचोंडी येथे भव्य सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.चिचोंडीतील श्री आनंद जैन मेडिकल ट्रस्ट,आणि वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, पाथर्डी येथील श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळ,मीरी येथील आनंद गुरू गोशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने या सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरामध्ये 205 रुग्णांची नेत्र तपासणी करून 20 रुग्णांची डोळ्यांच्या मोतीबिंदू ऑपरेशन साठी निवड करण्यात आली.ईसीजी,बीपी, शुगर 210 रुग्णांची तपासणी, आणि 21 बाटल्या रक्तदान करण्यात आले. हाडाचा ठीसुळपणा व कॅल्शियम तपासणीही करण्यात आली.तसेच देवाची आळंदी येथील ह.भ.प.ज्ञानेश्वर माउली शिंदे यांचे काल्याचे किर्तन झाले.या शिबीरासाठी डॉ अभय भंडारी,डॉ सचिन गांधी, प्रमोद गुगळे,आनंद गुगळे, कमलेश गुगळे, विठ्ठल गायकवाड, वैभव खलाटे,सुनिल गीते, शिवाजी दाणवे, सुरेश कुचेरीया,अभिजित गुगळे, एकनाथ आटकर, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.या सर्व रोग निदान शिबिरासाठी विश्वजीत गुगळे, डॉ बाबासाहेब गरड, गोवर्धन देखणे, शितल भैय्या बोगावत, फकिर सर व त्यांचे सर्व सहकारी, देखणे सर यांनी विशेष परिश्रम घेतले.शेवटी सर्वांना प्रीती भोजन देऊन या सोहळ्याची सांगता झाली.किर्तनासाठी पंचक्रोषीतील अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home Breaking News राष्ट्र संत प.पु.आनंद ऋषिजी महाराज यांच्या 125 व्या जन्मोत्सव सोहळ्या निमित्त चिचोंडी...







