Home Breaking News ग्रामीण रस्ते विकास कंत्राटी कर्मचारी संघटनेचे मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण : रामदास...

ग्रामीण रस्ते विकास कंत्राटी कर्मचारी संघटनेचे मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण : रामदास बर्डे

0

अहमदनगर (सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) ग्रामिण रस्ते विकास कंत्राटी कर्मचारी संघटनेचा मुंबईच्या आझाद मैदानावर २३ जून पासून उपोषणाला प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती या संघटनेने अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष रामदास बर्डे यांनी दिली.बर्डे पुढे म्हणाले की केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील कंत्राटी कर्मचारी यांच्या वेतनामध्ये प्राधान्याने सन २०१८ पासून कोणतीही वेतनवाढ न झाल्याने आमच्यावर होत असलेल्या अंन्यायाच्या विरोधात २३जून २०२५रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर आम्ही आमरण उपोषणास बसणार आहोत.उपोशन कर्त्यास काही त्रास झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनावर राहील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.बर्डे यांनी निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की शासनाच्या जाचक अटींचा उच्चार करून तातडीने वेतनवाढ मंजूर करावी.गेल्या चौदा वर्षांपासून आम्ही एकत्रित मानधनावर काम करत आहोत.सरकारने सन २०१८ मध्ये काही निर्णय जाहीर केले होते.पण ते निर्णय घेताना त्या वेळी कागदोपत्री काहीच टीपण न करता निर्णय घेण्यात आले होते.असे निदर्शनास आले होते.या निर्णयाची अंमलबजावणी करताना आक्रुतीबंध कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे व हलगर्जीपणा मुळे ही कार्यवाही करण्यात आलेली नाही.सरकार कडून सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. या विरोधात न्यायालयात दाद मागितल्याने कर्मचाऱ्यांना तर अधिकच त्रास दिला जात असल्याचा आरोपही निवेदनात नमूद करण्यात आला आहे.राज्यात भरमसाठ महागाई वाढत असताना आमच्या मानधनात कुठलीही दरवाढ केली जात नाही.आणि कालबाह्य यंत्रणेतील नव्या कर्मचाऱ्यांना दुप्पट मानधन देण्यात येत आहे. हा सरळ सरळ आमच्या वर अंन्याय होत आहे.त्यामुळे सरकारने वेतन वाढीसाठीच्या प्रस्तावांवर सन २०१२ पासूनचा फरक देण्याचा निर्णय घेण्यात यावा अशी संघटनेने मागणी केली आहे.या उपोषणास महाराष्ट्र राज्यातील अनेक ठिकाणचे कंत्राटी कर्मचारी पदाधिकारी बसनार आहेत.असे या निवेदनाद्वारे सरकारला कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here