Home Breaking News कासार पिंपळगाव येथे विरभद्र मंदिर जिर्णोध्दाराचा भुमीपुजन समारंभ संपन्न!

कासार पिंपळगाव येथे विरभद्र मंदिर जिर्णोध्दाराचा भुमीपुजन समारंभ संपन्न!

0

अहमदनगर (सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) कासार पिंपळगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर येथील ग्रामदैवत बिरोबा (विरभद्र)मंदिराच्या जिर्णोद्धाराचा भुमीपुजन समारंभ वरुण राजाच्या आशिर्वादाने मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शेवगाव तालुक्यातील लोळेगाव येथील बिरोबाभक्त बाबाजी महाराज बनसुडे व मांडवे येथील बिरोबा भक्त पप्पू महाराज जाधव आणि कासार पिंपळगावच्या सरपंच सौ.मोनालीताई राजळे आणि प्रमुख ग्रामस्थ यांच्या शुभहस्ते तसेच वाघोली येथील वेदशास्त्रसंपन्न विष्णुपंत भालेराव यांच्या मंत्रौच्चारात हा महायज्ञ आणि भुमीपुजन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.माजी आमदार स्वर्गीय राजाभाऊ राजळे यांनी ते हयात असताना त्यांच्या ईच्छा मनोकामनेच्या संकल्पनेतून हे पुरातन मंदिर नविन व्हावे असा आराखडा तयार केला होता.या मंदीराच्या सभामंडपाचे बांधकाम पूर्ण झाले त्याच वेळी हे नविन मंदिर पुर्णत्वास नेउन त्याचा लोकार्पण सोहळा राजाभाऊ राजळे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे पाच डिसेंबर रोजी करण्याचा मनोदय स्वर्गिय राजाभाऊ राजळे यांनी व्यक्त केला होता.आणि त्या दिशेने वाटचाल ही सुरू होती.परंतु राजाभाऊ राजळे अचानक आजारी पडले आणि ते ७ ऑक्टोबर रोजी ते आपल्या सर्वांना कायमचेच पोरके करून या जगाचा कायमचा निरोप घेउन निघून गेले. बिरोबा मंदिर बांधण्याची त्यांची इच्छा अधुरीच राहीली होती. परंतु त्यांच्या सुविद्य पत्नी आणि शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे यांनी आपले स्वर्गीय पती राजाभाऊ राजळे यांनी सादर केलेला तो संकल्प पूर्ण करण्याचा निर्णय ग्रामस्था समोर बोलून दाखवला आणि सर्व ग्रामस्थांनी होकार देउन गावातील हनुमान मंदिर आणि बिरोबा मंदिराचा जीर्णोद्धार हा सर्व ग्रामस्थांच्या मदतीने लोकवर्गणीतून पुर्णत्वास नेण्याचा निर्धार करून दोन्ही मंदिराच्या भुमीपुजनास प्रत्यक्ष प्रारंभ ही केला. विरभद्र मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या भुमीपुजन सोहळ्यासाठी ह.भ.प.नानासाहेब देशमुख,रामदास म्हस्के सर, द्वारकानाथ म्हस्के सर,संभाजी राजळे, सोपानराव तुपे,संदिप राजळे,हौसराव राजळे, हनुमान भक्त उत्तमनाना राजळे, दामोदर कांबळे गुरूजी,विनायक म्हस्के,चंद्रकांत म्हस्के, शिवाजीराव भगत, विक्रम राजळे सर, नारायण भगत,ज्ञानदेव जगताप,दादासाहेब पवार,यशवंत केळकर, हरीभाऊ तिजोरे, ग्रामसेवक प्रमोद म्हस्के, बाबासाहेब शिरसाठ, कारभारी शिंदे, ग्रामपंचायत सदस्य अप्पासाहेब राजळे,भिमराज हरार, गंगाराम शेरकर, अशोक गायकवाड, रमेश तुपे,आदिनाथ शेरकर, रामेश्वर राजळे, नवनाथ तिजोरे,अमोल जाधव,मारुती दारकुंडे, संतोष लवांडे, गोरक्षनाथ राजळे, रामराव राजळे,अनंत राजळे,अनिल नजन, योगेश नजन इत्यादी मान्यवरासह पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here