अहमदनगर (सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे यांच्या कासार पिंपळगावचे सरपंच पद हे अनुसूचित जमातीच्या व्यक्तीसाठी राखीव झाल्याने पुढील पाच वर्षासाठी सरपंच होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या अनेकांची इच्छा धुळीस मिळाली आहे तर काहींच्या पदरात घोर निराशा पडली आहे.आज दिनांक २३ एप्रिल २०२५ रोजी पाथर्डी येथील तहसीलदार उद्धव नाईक यांच्या कार्यालयात सन २०२५ ते२०३० या कालावधीत मूदत संपणाऱ्या एकूण १०८ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठीची सोडत काढण्यात आली होती. त्या सोडती मध्ये अनुसूचित जाती साठी (८ पदे),अनुसूचित जमातीच्या व्यक्तीसाठी (२पदे),नागरीकांच्या मागास प्रवर्गासाठी (२९पदे), आणि सर्व साधारण खुल्या प्रवर्गासाठी (६९पदे)अशा एकूण १०८ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीची सोडत काढण्यात आली.ती गावे पुढीलप्रमाणे आहेत.१)अनुसुचित जातीसाठी -कडगाव,सोमठाणे खुर्द,घाटशिरस,मोहटे,तोंडोळी,आल्हणवाडी,मिडसांगवी आणि शिरसाठवाडी,ही आठ,गावे आहेत.२) अनुसूचित जमाती साठी -कासारपिंपळगाव, आणि अंबिकानगर,ही दोन गावे आहेत.३) नागरीकांच्या मागास प्रवर्गासाठी- हनुमान टाकळी,भुतेटाकळी, मढी,निपाणीजळगाव, बोरसेवाडी,जवखेडे खालसा,मोहोज बुद्रुक,सैदापूर,चिचोंडी,जोगेवाडी,मोहोजखुर्द, वाळुंज,देवराई,खांडगाव,मुंगुसवाडे,येळी, ढवळेवाडी,कोपरे, शंकरवाडी,दुलेचांदगाव,चिंचपूर पांगुळ,पत्र्याचातांडा, सांगवीबुद्रुक,मांडवे, अकोला,सोमठाणे नलवडे, तिसगाव,चितळी, कामतशिंगवे ही एकोणतीस गावे आहेत .४) सर्व साधारण खुल्या प्रवर्गासाठी -आडगाव,आगसखांड, औरंगपुर,भालगाव, भारजवाडी,भिलवडे, भोसे,चिंचपूर ईजदे,चितळवाडी, चुंभळी,दगडवाडी, डमाळवाडी डांगेवाडी,ढाकणवाडी, धामणगाव,धनगर वाडी,धारवाडी, डोंगरवाडी,एकनाथ वाडी,घुमटवाडी, गीतेवाडी,हत्राळ, जांभळी,जवखेडेदुमाला,जवळवाडी,जीरेवाडी, कळसपिंप्री, करंजी,कारेगाव,करोडी, कौडगाव,केळवंडी, खरवंडी कासार,खेर्डे,कोल्हार,कोळसांगवी,कोरडगाव,लांडकवाडी,लोहसर, मालेवाडी,माळी बाभुळगाव, माणिकदौंडी,मीरी,दैत्य नांदुर, निवडुंगे,पाडळी,पागोरीपिंपळगाव,पिंपळगाव टप्पा, पिंपळगव्हाण,पिरेवाडी,रांजणी,रेणुकाईवाडी, साकेगाव,शेकटे,केशव शिंगवे,शिराळ,शिरापूर,सोनोशी,सुसरे,टाकळीमानुर,तिनखडी, वैजूबाभुळगाव, वडगाव,मोहोजदेवढे, पारेवाडी,जाटदेवळे, मोहरी, राघोहिवरे,सातवड,ही एकोणसत्तर गावे आहेत.सरपंचपद हे सर्व सामान्य जनतेतून निवडले जाणार आहे.त्यामुळे अनेकांनी आतापासूनच राजकीय डावपेच टाकायला सुरुवात केली आहे.या एकशेआठ अंब्युलंन्स गावातील सरपंच पदासाठीच्या सोडतीमुळे पाथर्डी तालुक्यातील बऱ्याच गावांतील अनेक म्होरक्यांची सरपंच होण्याची स्वप्ने धुळीस मिळाली आहे.या आरक्षण सोडतीमुळे पाथर्डी तालुक्यातील काही प्रमुख गावांमध्ये “कही खुशी कही गम “अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.कारण अनेक गावांत सरपंच पदासाठी अनेकजण अनेक दिवसांपासून गुढग्याला बाशिंग बांधून सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी तयारी करीत होते त्यांच्या सरपंच होण्याच्या स्वप्नावर पाणी फिरले आहे.तर काही गावात प्रस्थापितांना धक्का देऊन सरपंच पद ईतर प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे या सोडतीचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे.सर्वात जास्त स्वागत खुल्या प्रवर्गासाठीच्या गावात झाले आहे.नंतर नागरीकांच्या मागास प्रवर्गासाठी सरपंच पद आरक्षित झाल्यामुळे तेथे ही ओबीसी नेत्यांनी या सोडतीचे जोरदार स्वागत केले आहे.अनुसुचीत जाती आणि जमातीच्या व्यक्तीसाठी सरपंच पदाची सोडत काढण्यात आल्याचे जाहीर होताच अनेकांनी थेट आपल्या गावचा रस्ता धरत तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. थेट जनतेच्या दरबारातून सरपंच पदासाठी निवडणूक होणार असल्याने अनेक ठिकाणी वेगवेगळ्या समाजांतील युवक आणि युवती यांच्या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे.
Home Breaking News आमदार मोनिकाताई राजळे यांच्या कासार पिंपळगावचे सरपंच पद अनुसूचित जमाती साठी राखीव