अंबेजोगाई येथील महीला वकिलाला अमानुष मारहाण करणाऱ्या गुंडाविरोधात कारवाई करण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बार असोसिएशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

0

अहमदनगर (‌सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यातील सनगावातील महीला वकिलाला रिंगणात घेऊन अमानुषपणे मारहाण करणाऱ्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी करीत अहिल्यानगर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.बार असोशिएशनच्या या निवेदनात असे म्हटले आहे की बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे सत्र न्यायालयात वकिली व्यवसाय करणाऱ्या ॲडव्होकेट ज्ञानेश्वरी अंजान या महिला वकिलाला सनगावातील सरपंच आणि त्यांच्या गावगुंडांनी रिंगणात घेऊन अमानुषपणे मारहाण केल्याची घटना घडली आहे.काठ्या आणि लोखंडी पाईपच्या सहाय्याने प्रचंड प्रमाणात मारहाण केल्यामुळे महीला वकिलाच्या अंगातील रक्त साकळले आहे.पाठीवर काळे निळे वळ उमटलेले आहेत.अशा गंभीर प्रकारच्या घटनेचा अहमदनगर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने तीव्र शब्दांत जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे.तसेच या महिला वकिलाला अमानुष मारहाण करणाऱ्या आरोपी विरोधात कठोरात कठोर कारवाई करावी यासाठी अहिल्यानगर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने पाठपुरावा करण्यात येणार आहे. राज्यातील वकीलावर वारंवार हल्ले होत आहेत.राहुरी तालुक्यातील मानोरी येथील ॲडव्होकेट कै.राजाराम आढाव व त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट सौ.मनिषा राजाराम आढाव यांचा खंडणी दिली नाही म्हणून गेल्या वर्षी खून करण्यात आला होता. व म्रुतदेह प्लॅस्टिक पिशवीत भरून उंबरे येथील नदी पात्राच्या स्मशान भूमी जवळील विहीरीत टाकून दिला होता.व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.त्यामुळे वकिलाच्या संरक्षणासाठी वारंवार पाठपुरावा करूनही कायद्याच्या चौकटीत तरतूद होताना दिसत नाही.हा वकिलावर फार मोठा अन्याय होताना दिसत आहे.राज्यातील सर्व वकिलांना संरक्षण मिळावे यासाठी “ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट” संमत होउन त्याची तातडीने अंमलबजावणी होणे अत्यंत गरजेचे आहे. तसे न झाल्यास भविष्यात देखील वकिलावर अशा प्रकारे हल्ले होण्याची दाट शक्यता आहे.ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर न झाल्यास राज्यातील सर्व वकिलांना लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल. असे निवेदनात म्हटले आहे.जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना अहमदनगर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्षासह सर्व ॲडव्होकेट राजेश कातोरे,उपाध्यक्ष- वैभव आघाव,सचिव -संदीप बुरके,खजिनदार- अनुराधा येवले मॅडम,सहसचिव- मनिषा केळगंद्रे, महीला सचिव- जया पाटोळे,अनिता दीघे,सुरेश लगड,एस.एस. गायकवाड,अभीजीत देशमुख,साहेबराव चौधरी,अजिंक्य काळे, रामेश्वर कराळे,गौरी बसामलेटी,विजया कोतकर,आनंद सुर्यवंशी, क्रांती बागूल, राजवाडा शेख,तहेसीन शेख,नितीन ढोले, दिपक आडोळे, विजय केदार, शिवाजी शिंदे, ज्योती हिमने यांच्या सह अनेक नामवंत वकील उपस्थित होते. या घटनेमुळे संपूर्ण वकील वर्गात संतापाची लाट उसळली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक कठोर आणि प्रभावी उपाय योजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. कायद्याची रक्षक असलेल्या बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथील महीला वकिलाला अत्यंत क्रुर पद्धतीने केलेली मारहाण म्हणजे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे उडालेले धिंडवडे आहेत. राज्यातील गुंड मोकाट आणि गुन्हेगारी सुसाट अशी राज्याची अवस्था झाली आहे.ही घटना म्हणजे संपूर्ण राज्यभर अराजकता मातल्याची लक्षणे दिसू लागली आहेत. गावातील जत्रा जरी असली तरी गावातील सरपंचांनी पाळलेले गुंड गावच्या यात्रेत गावठी कट्टे घेऊन सामान्य लोकांना धमकावताना दिसत आहेत. बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यातील सनगावातील महीला वकिलाला रिंगणात घेऊन अमानुषपणे मारहाण करणाऱ्या सरपंचांनी पाळलेल्या गावगुंडाच्या नाकात आता वेसण घालण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.बीडचे पालकमंत्री म्हणून अंबेजोगाई येथील महीला वकिलाला झालेल्या अमानुष मारहाणी बाबद उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी गुंडगिरी करणाऱ्यांच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई करावी तरच गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील अशी मागणी राज्य वकील संघटनेने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here