अहमदनगर (सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) गुड फ्रायडे आणि इष्टर संडेचे वारे सर्वत्र वाहत असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील भेंडा फॅक्टरी येथे मात्र यहोवाच्या साक्षीदारांचे संमेलन भरविण्यात आले होते. त्यामध्ये प्रामुख्याने बायबल वर आधारीत “सत्य” तुम्हाला ते सापडू शकते का ? या विषयावर यहोवाच्या साक्षीदारा कडून संदेश देण्यात आला.आणि येशूच्या म्रुत्युचा स्मारक विधीचा कार्यक्रम अतिशय शांत रीतीने पार पाडण्यात आला.या कार्यक्रमाची सुरुवात एका सुंदर गीताने आणि प्रार्थनेने झाली. या कार्यक्रमाचे काही खास असे वैशिष्ट्य होते.येशू जिवंत असताना त्यांनी हा विधी का साजरा केला होता आणि त्याचा आज आपल्या साठी काय अर्थ होतो याचे सखोल विश्लेषण करून संदेश देण्यात आला.येशूने जसे बायबल द्वारे सांगितले अगदी त्याच पद्धतीने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.बायबल मध्ये जी वचन दर्शविण्यात आली होती त्या अनेक वचनाचे काटेकोरपणे वाचन करण्यात आले.तसेच या कार्यक्रमाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे तेथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये भाकरी आणि द्राक्षरस हे फक्त धार्मिक प्रतिक म्हणून सर्वत्र फिरवून प्रार्थना करण्यात आली.लोकांनी भाकर आणि द्राक्षरस आपल्या हातात घेऊन त्या बद्दल आदरनिय नम्र भाव व्यक्त केला.काही बंधू आणि भगिनींनी आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचे जोरदार स्वागत केले.देवदान हिवाळे,सुजीत मकासरे, अशोक सुर्यवंशी, जोएल नागावकर यांनी बायबल मधील येशूच्या म्रुत्युच्या स्मारक विधी विषयी अनेक वचनाद्वारे धार्मिक संदेश देऊन सर्वांचे गीता द्वारे समुपदेशन केले. या कार्यक्रमासाठी आदित्य खरात, संदिप गायकवाड आदेश खरात यांच्या सह पाथर्डी, शेवगाव, नेवासा तालुक्यातील अनेक गावांतील यहोवाचे साक्षीदार उपस्थित होते. शेवटी विनम्र होउन एका सुंदर आणि मनमोहक गीताने आणि एकाग्र चित्ताने केलेल्या प्रार्थनेने या कार्यक्रमाची सांगता झाली.यहोवाच्या साक्षीदारांनी संपूर्ण देशभर वेगवेगळ्या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा केला.