अहमदनगर (सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) उन्हाळ्यात उन्हाचा पारा जसजसा चाळीस अंशाच्या पुढे जातो तसतसे माणसाला पाणीदार फळे खाण्याची इच्छा निर्माण होते.आता उन्हाळ्यात टरबुज,खरबूज,संत्री, मोसंबी,केळी द्राक्षे,चिकू,अननस, ईत्यादी फळे व्यापारी बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी घेऊन येत आहे.मात्र याच हंगामात काही समाज विघातकी लोकांकडून बनावट औषधाचा वापर करून टरबुज आणि ईतर फळांना क्रुत्रिमरित्या पिकविले जात आहे असे निदर्शनास आले आहे. विशेषत: टरबुजाला इंजेक्शन द्वारे लालबुंद रंग देऊन ते आकर्षक आणि पिकलेले असल्याचा बनाव तयार केला जातो.अशा क्रुत्रिमरित्या पिकविलेल्या फळांचा आरोग्यावर भयानक परिणाम होत असुन ही विषारी फळे खाल्याने काही जणांना म्रुत्युला सामोरे जावे लागले आहे.शोशल मिडीयावर या संबंधीची माहिती प्रसिद्ध होताच काही ठिकाणी कारवाई सुद्धा झालेली आहे.भेसळयुक्त अन्न सुरक्षा विभागाने केलेल्या कारवाईत अंदाजे दोन ते तिन हजार किलो टन भेसळ युक्त टरबुज जप्त करून नष्ट करण्यात आले आहे.त्यामुळे टरबुज खरेदी करताना जनतेने अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे.औषधाच्या मदतीने कच्च्या फळांना इंजेक्शन देऊन आतल्या भागाला लाल रंग दिला जातो.अशा प्रकारे पिकलेले फळे आरोग्यास अतिशय हानिकारक आहे.काही व्यापारी अल्पदरात शेतकऱ्यांकडून टरबुज खरेदी करतात आणि नंतर कार्बाईड सारख्या रसायनांच्या सहाय्याने ती फळं पिकवतात.भारतीय अन्न सुरक्षा मानक आणि औषध प्रशासन प्राधिकरणाने एक व्हिडिओ जारी केला आहे.टरबुज कापून त्यावर कोरडा कापूस फिरवून तो भिजवून पिळा,जर कापूस लालबुंद झाला तर ते टरबुज बनावट आहे असे सांगितले गेले आहे.अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे क्रुत्रिमरित्या पिकविलेल्या विषारी टरबुजामुळे नुकताच एका बालकाचा मृत्यू झाला आहे.अवधुत योगेश आव्हाड (वय वर्षे ४) राहणार कोपरे तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर, हल्ली मुक्काम तिसगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर असं म्रुत बालकांचे नाव आहे. तिसगाव येथील रस्त्यावर बसलेल्या फळ विक्रेत्या कडून अवधुतचे वडील योगेश प्रकाश आव्हाड यांनी एक टरबुज खरेदी केले होते. ते टरबुज अगोदरच बनावट रितीने औषध लावून क्रुत्रिमरित्या पिकविन्यात आले होते. ते टरबुज अवधूत योगेश आव्हाड या चार वर्षांच्या कोवळ्या बालकाने खाल्याने त्याला उलट्या आणि जुलाब झाले.सदर बालकाला पाथर्डीचे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर गुगळे यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.त्यांनी तपासणी केली असता सदर बालकांच्या पोटात अत्यंत घातक अशी विषबाधा झाल्याचे दिसून आले.या विषारी टरबुजाच्या विषबाधेमुळे छोट्या अवधुतच्या शरीरात अतिशय भयानक परिणाम झाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.आणि औषधोपचार सुरू केले होते पण परीस्थिती अतिशय गंभीर असल्याने पाथर्डीतील डॉक्टर गुगळे यांनी अहिल्यानगर शहरातील बालाजी हाॅस्पिटल येथे सदर विषबाधा ग्रस्त बालकाला दाखल करण्याची मागणी केली होती.लगेचच बालाजी हाॅस्पिटल येथे सदर विषबाधा ग्रस्त बालकाला दाखल करण्यात आले होते.तेथे औषधोपचार सुरू असतानाच अवधूत आव्हाड या बालकाची प्राणज्योत मालवली. मोठ्या शोकाकुल वातावरणात बालकांच्या मुळ गावी कोपरे तालुका पाथर्डी येथे अंतिम संस्कार करण्यात आले.विषारी टरबुजामुळे तिसगावातील बालकाचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले असल्याने अहिल्या नगर येथील अन्न सुरक्षा मानक आणि औषध प्रशासनाने विषारी फळे विकणाऱ्या अनेक व्यापाऱ्यावर कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे टरबुज विक्रेत्यांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहेत. जनतेने फळे खरेदी करताना या विषारी फळांपासून सावधान रहावे असे आवाहन अन्न सुरक्षा मानक आणि औषध प्रशासन प्राधिकरणा मार्फत करण्यात आले आहे.अती विषारी टरबुजामुळे मात्र या बालकाचा नाहक बळी गेला आहे.
Home Breaking News क्रुत्रिमरित्या पिकविलेल्या विषारी टरबुजामुळे तिसगावातील बालकाचा म्रुत्यु,अन्न भेसळ आणि औषध प्रशासनाने टरबुज...