Home Breaking News राज्यातील आमदारांनो सावधान… प्रहारचा निळा दुपट्टा आणि भगवा झेंडा घेऊन येत आहे...

राज्यातील आमदारांनो सावधान… प्रहारचा निळा दुपट्टा आणि भगवा झेंडा घेऊन येत आहे रात्रीचा टेंभा मोर्चा

0

अहमदनगर (सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) ‌ राज्यातील आमदारांनो सावधान, प्रहारचा निळा दुपट्टा आणि भगवा झेंडा घेऊन येत आहेत टेंभा मोर्चा. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आसुड ओढणारे क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीदिनी आकरा एप्रिल रोजी रात्री बारा वाजता महाराष्ट्रातील तमाम आमदारांच्या घरावर प्रहार जनशक्ती पक्षातर्फे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बच्चुभाउ कडू यांच्या नेतृत्वाखाली हा टेंभा मोर्चा काढण्यात येणार आहे.डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पर्वाचे औचित्य साधून संपूर्ण राज्यभर या अनोख्या पद्धतीने आंदोलन हे उभारले गेले आहे. “शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव” या दोन प्रश्नावर हे मशाल आंदोलन करण्यात येणार आहे.महाराष्ट्रातील प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख,शहर प्रमुख यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन बच्चूभाउ कडू यांनी केले आहे. तसेच आपण केलेल्या आंदोलनाचा संपूर्ण लेखाजोखा व्हाट्सअप ग्रुपला पाठवण्याचे आदेशही देण्यात आले आहे.जे कार्यकर्ते आंदोलन करणार नाहीत किंवा आंदोलनात सहभागी होणार नाहीत त्यांचीही नावे मुख्य कार्यालयाला कळविण्यात यावी असेही सांगितले गेले आहे. संजय गोमकाळे आणि भास्कर मासुतकर हे व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर नियंत्रण ठेवण्यासाठी तत्पर झाले आहेत.आंदोलन हे प्रहार स्टाईलनेच झाले पाहिजे असे आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना सांगण्यात आले आहे.त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्व आमदारांनी आता सतर्कता बाळगली पाहिजे.या अनोख्या पद्धतीने केलेल्या आंदोलनावर सरकार नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.क्रांतीबा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन करून आणि त्यांना मानाचा मुजरा करून या आंदोलनाला सुरुवात करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here