अहमदनगर (सुनिल नजन “चिफब्युरो” अहिल्यानगर जिल्हा) अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील लोळेगाव येथे वाण वह्याच्या जुगलबंदीत बिरोबा होईक महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. लोळेगावचे ग्रामदैवत असलेल्या विरभद्र (बिरोबा) मंदिरात दि.22आँक्टोबर रोजी याञा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या महोत्सवात प्रामुख्याने वाणवह्याच्या जुगलबंदीत ओवी गायन, डफाच्या तालावर नाचकाम करीत देवाच्या काठीची गावातील नव्या मंदिरा पासून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती. गावच्या पश्चिमेस असलेल्या जुन्या बिरोबा देवस्थानाला प्रथम मान देऊन तेथे महापूजा करण्यात आली. गावच्यावेशीतून मारूतीचे दर्शन घेऊन पुन्हा मुळ ठिकाणी देवाची काठी वाजत गाजत आली.मुळ ठिकाणी आल्यावर होईकाचा (भविष्यवाणी) कार्यक्रम संपन्न झाला.तेथील मुख्य बिरोबाभक्त बाबाजी महाराज बनसुडे यांनी वेताच्या काठीचे छत्तीस वार आपल्या अंगावर घेत आगामी वर्षांची होईकाद्वारे पुढील प्रमाणे भविष्यवाणी कथन केली.” दिवाळीचा दिवा सौमुलखी साजरा होईल, शेळ्या मेंढ्या आनंदी राहतील,गोंदण भरल, चळण फिरून सटीच सटवण बांदाआड बांद पडेल. गहु-हरबरे जोडीने पिकतील,सवाईन विकतील, दुगधर येतील,गाईचा गोर्हा पालखीत मिरवल,लढाई होईल, राज्यात गोंधळ मातेल ,ढगफुटी होईल, आभाळ गरजेल, चैत्र गळलं, मिरूग साधल, नंदी हालतेन,एक महिन्याची आखाडी पडेल.”या प्रमाणे बाबाजी बनसुडे यांनी आगामी काळातील होईकाद्वारे भविष्यवाणी कथन केली.गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.लोळेगाव ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी शाळा सुटल्यावर महाप्रसादाचा लाभ घेतला.पुढील वर्षी भव्य आणि दिव्य स्वरूपात हा महोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.222 शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील अनेक गावातील बिरोबाभक्त यावेळी उपस्थित होते.