कर्तव्यदक्ष आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या संकल्पनेतून आशिया खंडातील सर्वात मोठी शिवसृष्टी

0

नांदगाव :नुकत्याच झालेल्या एका ऐतिहासिक क्षणात, महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते नांदगाव तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या संकल्पनेतून आशिया खंडातील सर्वात मोठी शिवसृष्टी नांदगाव शहरात भव्यदिव्य सोहळ्यात लोकार्पित करण्यात आली. या शिवसृष्टीच्या स्थापनेमुळे नांदगाव शहराच्या विकासाला एक नवा आयाम मिळाला आहे.दरम्यान, मनमाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवस्मारक परिसरात मेकडमारीवरून पावसाचे पाणी गळत असल्याचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात आला होता. काल शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे हा प्रकार घडला होता. याबाबत तात्काळ दखल घेत मनमाड नगरपरिषदेने योग्य ती कारवाई केली आहे. नगरपरिषदेमार्फत त्वरीत पावले उचलून आजच दिवसभरातच मेकडमारीची दुरुस्ती करण्यात आली आहे, आणि आता कोणत्याही प्रकारची समस्या उभी राहिलेली नाही.सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, समाजमाध्यमांवर प्रसिद्ध होणाऱ्या अशा प्रकारच्या व्हिडिओंवर विश्वास ठेवू नये. शिवस्मारक हा मनमाड शहराचा अभिमानाचा विषय असून, यातील कोणत्याही त्रुटी अथवा दोषांचे निराकरण तातडीने करण्यात येत आहे. मनमाड वासीयांनी कुठल्याही प्रकारच्या संभ्रमात न पडता या ऐतिहासिक स्मारकाचे मनःपूर्वक कौतुक करावे व शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर आधारित या स्थानाचे महत्त्व ओळखावे.नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील भाऊ हांडगे यांनी देखील नागरिकांना विनंती केली आहे की, समाजमाध्यमांवरील अफवांवर विश्वास न ठेवता, प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांना साथ द्यावी व विकासाच्या या प्रवाहात सहभाग नोंदवावा. तसेच आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सूचना दिल्यानंतर मुख्याधिकारी मनमाड नगरपरिषद तथा प्रशासक यांचे तातडीच्या हस्तक्षेपामुळे मेकडमारीची दुरुस्ती लवकर पूर्ण झाली आणि समस्येचे निराकरण झाले म्हणून त्यांचेदेखील मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.हांडगे यांनी पुढे असेही आवाहन केले आहे की, हे स्मारक मनमाड शहराची शान असून, नागरिकांनी त्याचे व्हिडिओ व्हायरल न करता स्मारकाचा सन्मान जपला पाहिजे.शिवस्मारकाचे देखभाल व व्यवस्थापन अत्यंत सुयोग्य प्रकारे करण्यात येणार असून, भविष्यात अशा कोणत्याही समस्या उद्भवणार नाहीत याची काळजी प्रशासनाकडून घेतली जाईल. शिवस्मारकाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे संवर्धन व प्रसार करण्यात येत आहे, जे पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.भव्यदिव्य सोहळ्यात लोकार्पित करण्यात आली. या शिवसृष्टीच्या स्थापनेमुळे नांदगाव शहराच्या विकासाला एक नवा आयाम मिळाला आहे.दरम्यान, मनमाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवस्मारक परिसरात मेकडमारीवरून पावसाचे पाणी गळत असल्याचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात आला होता. काल शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे हा प्रकार घडला होता. याबाबत तात्काळ दखल घेत मनमाड नगरपरिषदेने योग्य ती कारवाई केली आहे. नगरपरिषदेमार्फत त्वरीत पावले उचलून आजच दिवसभरातच मेकडमारीची दुरुस्ती करण्यात आली आहे, आणि आता कोणत्याही प्रकारची समस्या उभी राहिलेली नाही.सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, समाजमाध्यमांवर प्रसिद्ध होणाऱ्या अशा प्रकारच्या व्हिडिओंवर विश्वास ठेवू नये. शिवस्मारक हा मनमाड शहराचा अभिमानाचा विषय असून, यातील कोणत्याही त्रुटी अथवा दोषांचे निराकरण तातडीने करण्यात येत आहे. मनमाड वासीयांनी कुठल्याही प्रकारच्या संभ्रमात न पडता या ऐतिहासिक स्मारकाचे मनःपूर्वक कौतुक करावे व शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर आधारित या स्थानाचे महत्त्व ओळखावे.नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील भाऊ हांडगे यांनी देखील नागरिकांना विनंती केली आहे की, समाजमाध्यमांवरील अफवांवर विश्वास न ठेवता, प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांना साथ द्यावी व विकासाच्या या प्रवाहात सहभाग नोंदवावा. तसेच आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सूचना दिल्यानंतर मुख्याधिकारी मनमाड नगरपरिषद तथा प्रशासक यांचे तातडीच्या हस्तक्षेपामुळे मेकडमारीची दुरुस्ती लवकर पूर्ण झाली आणि समस्येचे निराकरण झाले म्हणून त्यांचेदेखील मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.हांडगे यांनी पुढे असेही आवाहन केले आहे की, हे स्मारक मनमाड शहराची शान असून, नागरिकांनी त्याचे व्हिडिओ व्हायरल न करता स्मारकाचा सन्मान जपला पाहिजे.शिवस्मारकाचे देखभाल व व्यवस्थापन अत्यंत सुयोग्य प्रकारे करण्यात येणार असून, भविष्यात अशा कोणत्याही समस्या उद्भवणार नाहीत याची काळजी प्रशासनाकडून घेतली जाईल. शिवस्मारकाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे संवर्धन व प्रसार करण्यात येत आहे, जे पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here