अहमदनगर (सुनिल नजन “चिफब्युरो”/स्पेशल क्राईम रिपोर्टर अहमदनगर जिल्हा) संपूर्ण महाराष्ट्रात दिव्यांगाचे खोटे प्रमाणपत्र मिळवून नोकरी मिळवलेल्या बदमाश कर्मचाऱ्यांची पुन्हा फेर मेडिकल तपासणी करावी आणि खोटे प्रमाणपत्र मिळवल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्या वर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिव्यांगाचे नेते मंत्री बच्चूकडू यांनी दिले आहेत.संपूर्ण महाराष्ट्रात दिव्यांगाचे खोटे प्रमाणपत्र मिळवून अनेक महाभागांनी सरकारी, निमसरकारी विभागात नोकऱ्या मिळवल्या आहेत. गेल्या महिन्यात संपूर्ण देशभरात पुजा खेडकर प्रकरण चांगलेच गाजले होते. पुजा खेडकर यांनी दिव्यांगाचे खोटे प्रमाणपत्र मिळवून
युपीएससीची फसवणूक करून आय ए एस हे पद मिळवले होते.याची युपीएससी ने तात्काळ दखल घेऊन अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील पुजा खेडकर यांच्या वर कार्यवाही केली आहे. दिव्यांगाचे सदर खोटे प्रमाणपत्र मिळवून खऱ्या दिव्यांगावर घोर अंन्याय होत आहे. जात पडताळणीच्या धर्तीवर जिल्हा पातळीवर दिव्यांगाची पडताळणी समिती स्थापन करणे आवश्यक आहे.यासाठी आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग यांनी स्वतंत्र बैठका घेऊन कार्यवाही करण्या साठीच्या सुचना दिलेल्या आहेत.खऱ्या दिव्यांगाला न्याय देण्यासाठी दि.19 जुलै ते 3 आँगष्ट या काळात बोगस दिव्यांग शोध मोहीम अभियान राबवले होते.त्या शोध मोहीमेतून अनेक विभागात शासकीय निमशासकीय कार्यालयात सेवेत असलेल्या अनेक उमेदवारांची नावे आढळून आलेली आहे. सदर संशयित उमेदवारांची दिव्यंगत्वाची पुन्हा फेर तपासणी करून त्यातील सत्यता पडताळणे आवश्यक आहे.महाराष्ट्र राज्यातील संशयित दिव्यांगाची एक यादी तयार करण्यात आली असुन त्यांची पडताळणी करून खोटे प्रमाणपत्र आढळल्यास त्यांच्या विरुद्ध फौजदारी स्वरुपाची कडक कारवाई करून सेवेतून ताबडतोब बडतर्फ करावे.आणि त्या जागेवर प्रतिक्षा यादीतील खऱ्या दिव्यांगाची नेमणूक करण्यात यावी .आणि ज्यांनी खोटे प्रमाणपत्र तयार करून दिले आहेत त्या अधिकाऱ्याच्या विरोधातही फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत अशा स्वरूपाच्या सुचना संबंधित विभागाला देण्यात आलेल्या आहेत.खऱ्या दिव्यांगाना न्याय देण्यासाठी आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग,व संबंधीत प्रशासकीय विभागास सुचना देऊन पंधरा दिवसांत दिव्यांग पडताळणी समिती स्थापन करून योग्य ती कार्यवाही करण्या साठीच्या सुचना संबंधीत विभागाला देण्यात आल्या आहेत. तसेच अपंगांचा वेडा, मुकबधीर, आंधळा,एकडोळा, बहीरा,लंगडा,ईत्यादी शब्द वापरून अपमान केल्यास अपंग व्यक्तीचे हक्क अधिनियम 2016 च्या शिक्षेतील तरतुदीनुसार सहा महीने ते पाच वर्षा पर्यंत शिक्षेची आणि दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. दिव्यांगांना त्वरित न्याय देण्यासाठी दिव्यांगाच्या वतीने करण्यात आलेल्या न्यायालयातील केसेस फास्ट स्ट्रोक न्यायालया प्रमाणे त्वरित निकाली काढून आरोपी विरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश देऊन दिव्यांगाना न्याय मिळवून देण्यासाठी तात्काळ प्रयत्न करावेत म्हणून न्यायालयाना विनंती वजा पत्रे सामाजिक न्याय विभागाकडून देण्यात आली आहेत.अहमदनगर जिल्ह्यातील दिव्यांगाचे खोटे प्रमाणपत्र मिळवून काही शिक्षकांनी शाळा महाविद्यालयात नोकऱ्या मिळवल्या आहेत त्यांचीही कसुन फेर मेडिकल तपासणी करून खोटे आढळून आल्यास त्यांनाही सेवेतून ताबडतोब बडतर्फ करण्यासाठी सुचना देण्यात आलेल्या आहेत.भविष्यातही दिव्यांगाना त्रास दिल्यास त्याची फार मोठी किंमत त्रास देणाऱ्या नराधमाला मोजावी लागणार आहे. दिव्यांगा संबंधीतचे सर्व कायदे आता कडक करण्यात आले आहेत. दिव्यांगाच्या नादी लागणाऱ्यांना शंभर वेळा विचार करावा लागणार आहे. दिव्यांगाना त्रास दिला आहे म्हणून ज्यांच्या विरोधात न्यायालयात खटले सुरू आहेत त्यांचे मात्र आता चांगलेच धाबे दणाणले आहेत. कारण दिव्यांगाचे खटले आता त्वरित निकाली निघणार आहेत.
Home Breaking News दिव्यांगाचे खोटे प्रमाणपत्र मिळवून नोकरी मिळवलेल्या बोगस उमेदवारांची पुन्हा मेडिकल तपासणी करून...