माता आणि बाल सुरक्षेसाठी मोदी सरकारचा स्तुत्य उपक्रम, किलकारी योजना:- डॉ भारती पवार

0

राज्य : गुजरात आणि महाराष्ट्रातील स्थानिक भागातील लाभार्थ्यांसाठी किलकारी या फिरत्या आरोग्य (एम-हेल्थ) उपक्रमाचा, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रा .एस. पी. सिंग बघेल यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रारंभ केला. यावेळी गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेलही या कार्यक्रमाला उपस्थित होते.मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्त्यांच्या (आशा) ज्ञानाचा विस्तार आणि अद्ययावतीकरण करण्यासाठी तसेच मोबाईल फोनद्वारे त्यांचे संवाद कौशल्य उंचावण्यासाठी तयार केलेला मोबाइल अकादमी हा एक विनामूल्य ध्वनिमुद्रित प्रशिक्षण अभ्यासक्रम देखील सुरू करण्यात आला.या उपक्रमांचा प्रारंभ झाल्याबद्दल डॉ. भारती प्रवीण पवार यांनी आनंद व्यक्त केला. मानवजातीच्या फायद्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल आरोग्य भारत निर्माण करण्याच्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या ध्येयदृष्टीच्या अनुषंगाने, देशातील आरोग्य क्षेत्राच्या परिवर्तनाच्या वेगवान गतीशी एम-आरोग्य उपक्रम संयुक्तीक आहे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि केंद्रीय आरोग्य मंत्री श्री मनसुख मांडविया जी यांच्या मार्गदर्शनाखाली भारत सरकार निरोगी आणि समृद्ध भारतासाठी आपल्या माता आणि नवजात बालकांना उपलब्ध असलेल्या आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी कटिबद्ध आहे असे त्या यावेळी म्हणाल्या.किलकारी’ (म्हणजे ‘बाळाचे खिदळणे’ ), ही केंद्रीकृत संवादात्मक ध्वनी प्रतिसाद (आयव्हीआर) आधारित मोबाइल आरोग्य सेवा आहे जी गर्भधारणा, बाळंतपण आणि बाल संगोपन विषयक 72 श्राव्य संदेश थेट कुटुंबांच्या मोबाईल फोनवर गर्भधारणेच्या दुसऱ्या तिमाहीपासून मूल एक वर्षाचे होईपर्यंत मोफत, साप्ताहिक, कालबद्ध पद्धतीने वितरीत करते.महिलेच्या एलएमपी (शेवटची मासिक पाळी) किंवा मुलाच्या डिओबी (जन्मतारीख) नुसार ज्या महिला प्रजनन बाल आरोग्य (आरसीएच) पोर्टलमध्ये नोंदणीकृत आहेत अशा गरोदर महिला आणि एक वर्षाच्या आतील मुलांच्या मातांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर आधीच ध्वनिमुद्रित केलेल्या श्राव्य संदेशासह आठवड्यातून एकदा फोन केला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here