मुंबई (मुरबाड – प्रतिनिधी महेश्वर तेटांबे)अक्षरा सामजिक प्रतिष्ठान संस्था मागील १४ वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करीत आहे. संस्थेमार्फत गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत तसेच महिलांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. जुने वर्ष संपून येणाऱ्या नवीन वर्षासाठी नवीन उभारी, नवा निश्चय, नवी प्रेरणा घेण्यासाठी अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान साठी २०२४ हे वर्ष खूप खास असणार आहे . कारण प्रत्येक अडचणीवर मात करत आपली संस्था सर्वाचा सहकाऱ्याने व मेहनतीने १५ व्या वर्षात पदार्पण करत आहे . हया वर्षात अधिक जोमाने संस्थेचे कार्य महाराष्ट्रातील तळा- गाळातील गरजू घटकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहे. ह्या वर्षी २०२४ कामाची सुरुवात पाहिल्या दिवशी मुरबाड तालुक्यातील आदिवासी पाड्यावरील विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्या सहभागाने कार्यक्रम घेऊन करण्यात आली. अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान, रायगड हॉस्पिटल आणि निराधार सामाजिक संस्था ह्याचा संयुक्त विद्यमाने दिनांक १३ जानेवारी,२०२४ रोजी मुरबाड तालुक्यातील आदिवासी पाड्यावर ग्रामस्थांसाठी वैद्यकीय शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास स्थानिक ग्रामस्थांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला. तसेच या वैद्यकीय शिबिरात अंदाजीत ९० ते १०० ग्रामस्थांच्या आजारपणाचे निदान करण्यातआले व २५ रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया रायगड रुग्णालयात करण्यात येणार आहे. तसेच आदिवासी पाड्यावरील गरीब, गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटप करण्यात आले. याप्रसंगी अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री अमोल वंजारे, निराधार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री .शिंदे, अक्षरा सामाजिक संस्थेचे मुंबई समन्वयक,श्री संदीप मोहिते, मुंबई समन्वयक (महिला) सौ. वसुधा वाळुंज, श्री.साईनाथ वंजारे, समाजसेविका सौ.गीता ताई मोहपे, रायगड हॉस्पिटलचे डॉक्टर्स आणि नर्सेस, सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. या उपक्रमास हातभार लावलेल्या सर्वांचे संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
Home Breaking News अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान तर्फे मुरबाड आदिवासी ग्रामस्थांना शैक्षणिक आणि वैद्यकीय मदत.