Home Breaking News जवखेडे खालसा ग्रामपंचायत निवडणूकीत चैतन्यचा फटका कुणाला, स्वाभिमानीला का शेतकरीला यावरच विजयाचे...

जवखेडे खालसा ग्रामपंचायत निवडणूकीत चैतन्यचा फटका कुणाला, स्वाभिमानीला का शेतकरीला यावरच विजयाचे गणित अवलंबून!

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर) जिल्ह्यातील संपूर्ण पाथर्डी तालुक्याचे लक्ष लागलेल्या जवखेडे खालसा ग्रामपंचायत निवडणूकीत तिरंगी लढतीत हिंदुत्ववाच्या मुद्द्यावर उभ्या असलेल्या तिसऱ्या चैतन्य कनिफनाथ ग्रामविकास मंडळाने एकूण पाच उमेदवार उभे करत सत्ताधारी स्वाभिमानी मंडळ आणि विरोधी शेतकरी मंडळ यांची चांगलीच दमछाक केली आहे. चैतन्य कानिफनाथ मंडळ नेमका फटका कोणाला देणार यावरच विजयाचे गणित अवलंबून आहे. चैतन्य मंडळाने वार्ड क्र.१मधून एकही उमेदवार उभा केलेला नाही.२ मध्ये वाघ निलेश रामचंद्र आणि वाघ तनुजा नरेंद्र, वार्ड क्र.३ मध्ये वाघ सोमनाथ भिवसेन,वार्ड क्र.४मध्ये सरगड पवन सुनिल आणि सरपंच पदासाठी घाटुळ विष्णु हरी या पाच उमेदवारांनी निवडणूकीत चांगलीच रंगत आणली आहे. सत्ताधारी स्वाभिमानी मंडळाचे उमेदवार पुढील प्रमाणे प्रभाग क्र.१ मधून कासार गणेश सिताराम, सौ.कासार शुभांगी संतोष, प्रभाग क्र.२ मधून स्वाभिमानी मंडळाचे नेते वाघ अमोल अच्युतराव,सौ.आंधळे शांताबाई प्रल्हाद, सौ.शेख रुबाबी जाफर,प्रभाग क्र.३ मधून पठाण इरफान साहेबखाँ,सौ.जाधव कौसाबाई केरू,सौ सरगड भारती शरद,प्रभाग क्र.४ मधून वाघमारे स्वप्नील पंढरीनाथ,मतकर संतोष अशोक, सौ.वाघ कविता संदीप आणि सरपंच पदासाठी आंधळे विशाल विक्रमराव हे निवडणूक लढवित आहेत. गेल्या पाच वर्षात विरोधात राहीलेले विरोधी आणि आता सत्तेचे प्रबळ दावेदार असलेल्या शेतकरी ग्रामविकास मंडळाचे उमेदवार पुढील प्रमाणे प्रभाग क्र.१ मधून कासार लक्ष्मण कारभारी, कासार स्वाती राजेंद्र, प्रभाग क्र.२ मधून आव्हाड पाराजी विश्वनाथ, वाघ सुनिता राजेंद्र, शेख सलिमाबी महंमद, प्रभाग क्र.३ मधून शेख शहाबुद्दीन बाबुलाल,जाधव मिराबाई शिवाजी, गवळी वर्षा अमोल, प्रभाग क्र.४ मधून वाघमारे बाबासाहेब कोंडी़राम, मतकर गोविंद घनश्याम, आंधळे विद्या वैभव आणि सरपंच पदाचे प्रबळ दावेदार वाघ चारुदत्त ऊद्धवराव हे उमेदवार निवडणूक लढवित आहेत. जनतेतून लोकनियुक्त सरपंच होण्यासाठी एकुण पाच उमेदवार उभे आहेत.१)चारुदत्त उद्ववराव वाघ(छत्री),२)घाटुळ विष्णु हरी(नगारा),३)आंधळे विशाल विक्रमराव(बँट) ४)जाधव अमोल अरविंद(हिरवी मिरची),५) वाघ शिवाजी पांडुरंग(गँस सिलेंडर) हे सरपंच पदासाठी वरील चिन्हावर आपले आपले नशिब अजमावत आहेत. संपूर्ण गावाचे आराध्य दैवत असलेल्या कान्होबा उर्फ कानिफनाथ मंदिरात जाउन प्रथम चैतन्य, स्वाभिमानी, आणि शेवटी शेतकरी मंडळाच्या उमेदवारांनी प्रचाराचा शुभारंभ केला. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत अत्यंत खालच्या पातळीवर जाउन प्रचार सुरू आहे.स्वाभिमानी मंडळाच्या प्रचाराच्या वेळी अच्युतराव वाघ,राधाकिसन कासार सर,संतोष कासार, होळकर सर,इसाक शेख,ताजुद्दीन शेख,नारायण मतकर,कैलास मतकर, प्रकाश वाघ,प्रल्हाद आंथळे,अशोक मतकर हे उपस्थित होते तर शेतकरी मंडळाच्या प्रचाराच्या शुभारंभा प्रसंगी जेष्ठ नेते उद्ववराव वाघ, पोपटराव आंधळे,अँड लतिफभाई शेख,उद्धवराव आंधळे,नुरमहंद शेख,मुस्ताकभाई शेख,शमशुद्दिन शेख,सुरेश वाघ,रावसाहेब कासार, बाळासाहेब भोसले, विजय भोसले, उत्तम आंधळे,दगडू आंधळे, हारी आव्हाड, उत्तम कासार, वैभव आंधळे, अमोल गवळी, भाउसाहेब वाघ, संभाजी वाघ, शिवाजी मतकर,वाघमारे सर,मतकर संजय,नामदेव सरगड,राजमहंमद शेख,यांच्या सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. अटीतटीच्या लढाईत मतविभागणीचा फायदा नेमका कोणाला होणार त्यावरच विजयाचे गणित अवलंबून आहे.(“कौण बनेगा जवखेडे का सरपंच”)यावर गावात पैजा पडलेल्या आहेत. सामांन्य मतदार मात्र आपले मत कोणाला हे सांगायला तयार नाही.घोडा मैदान जवळच असल्याने सर्वच उमेदवारांना विजयाची खात्री वाटत आहे.”टांगा पलटी, घोडे फरार” कोणाचे होणार हे मात्र सामांन्य मतदार राजाच्याच हातात आहे.जवखेडे-कासारवाडी या ग्रुप ग्रामपंचायत निवडनुकीच्या निमित्ताने गावातील वातावरण मात्र चांगलेच ढवळून निघाल्याचे दिसून येत आहे. (आँन द स्पाँट रिपोर्टर /सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here