Home Breaking News धनगर समाज आरक्षण आंदोलन एल्गार चोंडीपासूनच्या उपोशनाने सुरू,” सरकारला “देता का जाता”...

धनगर समाज आरक्षण आंदोलन एल्गार चोंडीपासूनच्या उपोशनाने सुरू,” सरकारला “देता का जाता” चा नारा देत ईशारा

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर)-संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असतानाच आता त्यामध्ये धनगर समाज एस टी आरक्षण मागणीच्या थिणगीने पेट  घेतला आहे.दि.६ सप्टेंबर पासून अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील अहिल्यादेवीचे जन्म गाव चोंडीतील अहिल्यादेवीच्या स्मारकापासुन या उपोषण एल्गार आंदोलनाला बेल भंडारा उधळून “आरक्षण देता की मग सत्तेवरून जाता” हा नारा देत सुरुवात करण्यात आली.संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यात हा आरक्षणाचा उपोषण एल्गार सुरु होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाला एसटी आरक्षण देण्याची मागणी सुरू आहे.परंतु सर्वच राजकीय पक्षांनी संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या तोंडाला पाने पुसली आहेत. आरक्षणाची ही मागणी हेतुपुरस्कर बाजूला ठेवून धनगर समाजाला वेठीस धरले आहे.५५ विधानसभा मतदारसंघात आणि ४८ लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची निर्णायक ताकद आहे. सर्वच राजकीय नेत्यांनी निवडनुकीत धनगर समाजाच्या मतावर डोळा ठेवून फक्त वापरून घ्यायचे आणि सत्ता मिळाली की पळवाटा काढून धनगर आरक्षण मुद्याचे भिजत घोंगडे ठेवायचे आणि मुळ मुद्याकडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष करण्यासाठीची कुटनिती सर्वच पक्षांनी अवलंबीली आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला की आदिवासींच्या बगलबच्चांना पुढे करत धनगर आरक्षणाचा मुद्दा हाणून पाडायचा हा जुना खेळ सर्वच राजकीय पक्ष वर्षानुवर्षे खेळत आले आहेत. फक्त धनगर समाजाला राजकीय आरक्षण न देता बावीस योजनांच्या सवलतीचे गाजर दाखवून समाजाची बोळवण करायची हे सर्व धनगर समाजाच्या नेत्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे धनगर समाज आता पेटुन उठला आहे. आरक्षणासह इतर सर्व मागण्या मांन्य करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाजाच्या वतीने उपोषण एल्गाराचे हत्यार उपसले आहे. त्याची सुरुवात राज्य यशवंत सेनेच्या वतीने अहिल्यादेवीचे मुळ जन्म गाव जामखेड तालुक्यातील चोंडी येथून सुरुवात करण्यात आली आहे. संसदेच्या विषेश अधिवेशनात महाराष्ट्रातील धनगर समाजाचा एस् टी प्रवर्गातील आरक्षणा साठीचा वटहुकूम काढल्याशिवाय मागे हटणार नाही असा ईशारा यशवंत सेनेच्या वतीने दिला आहे. भाजपाची सत्ता येताच पहिल्या कँबिनेट अधिवेशनात धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिले होते. त्याची आठवण करून देत धनगर समाजाच्या वतीने आता शेवटचा ईशारा देण्यात आला आहे.पाच वर्षे पुर्ण झाली आणि आता पुन्हा दुसऱ्यांदा सत्ता मिळाली तरीही धनगर समाजाची आरक्षणाची मागणी सरकारने पुर्ण केलेली नाही.बारामतीचे बाळासाहेब दोडतले आणि माणिकराव दागडे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाची स्पष्ट शब्दात भुमिका मांडली. सर्व पक्षाच्या विरोधात धनगर समाजाने ठामपणे उभे राहून एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीचा केंद्रातून जो पर्यंत वटहुकूम काढला जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती सांगितली गेली.चोंडीतील या उपोशन एल्गार आंदोलनात अहिल्यादेवीचे माहेरचे वंशज अक्षयजी शिंदे, अण्णासाहेब रुपनर(माळशिरस), गोविंद नरवटे(लातूर),सुरेश बंडगर (परभणी),समाधान पाटील (जळगाव),नितीन धायगुडे(नातेपुते),किरण घालमे(इंदापूर), बाळासाहेब गायके(बीड),चोंडीचे सरपंच सुनिल उबाळे,अजित शिंदे, अतिश शिंदे, अमोल उबाळे, गणेश उबाळे, सहभागी झाले आहेत.सरकार या आंदोलनाचा किती गांभीर्याने विचार करणार हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here