मनमाड : मनमाड नांदगाव दरम्यान (NH753J) बंद असलेली स्ट्रीट लाईट सुरू करण्याबाबत निवेदन *मा. आमदार सुहास आण्णा कांदे* व *मा. मुख्य कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग,नाशिक* यांना देण्यात आले होते. त्या निवेदनाची दखल घेत आज मनमाड नांदगाव दरम्यान (NH753J) महामार्गाचे चौपदरीकरण नवीन काँक्रिटीकरण काम पूर्ण झालेले असून त्यावर आधारित सुरू आहे मात्र विद्युत दिवे स्टेट लाईट सुरु करण्यास आलेले नाही त्यामुळे रात्रीच्या सुमारास अंधार असल्याने बीपीसीएल कंपनी इंडियन ऑइल कंपनी त्या कंपन्यांचे टँकर भरदा वेगाने धावत असतात तसेच रस्ता चांगला झाल्याने वाहनांचा वेग वाढला आहे त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे सदरील रस्त्यावर सिकंदर नगर ते बुरुकुलवाडी अंधार जास्त असल्यामुळे लोकांना (ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना) रस्ता ओलांडताना येण्या-जाण्या कामी जीवमुती धरून रस्ता ओलांडावा लागतो. अंधारामुळे असंख्य अपघात होत आहे जीवित हानी देखील झाली आहे.रस्ता सुरू होऊनही रस्त्यावर स्टेट लाईट का सुरू करण्यात आले नाही याविषयी संबंधित अधिकाऱ्यांशी व आमदार साहेबांकडे शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे,दिनेश घुगे यांनी पाठपुरवठा करून आज प्रयत्नांना यश मिळाले. तसेच आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर याविषयी निर्णय घेण्यात आला.
Home Breaking News मनमाड नांदगाव दरम्यान (NH753J) रस्त्यावरील बंद असलेले स्टेट लाईट सुरू करण्याचा :...