नाशिक : नाशिक जिल्हा शिक्षण विभाग व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नाशिक यांच्या वतीने लिडरशीप फाॅर इक्विटी या स्वयंसेवी संस्थेने शिक्षकांसाठी आयसीटीसी अर्थात इंट्रोडक्शन टू काॅम्प्युटेशनल थिंकिंग ॲन्ड कोडिंग ह्या कोर्सचे आयोजन करण्यात आले होते. ऐच्छिक स्वरुपात असलेल्या या ऑनलाईन कोर्सला जिल्ह्यातील शिक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. ५२३ शिक्षकांनी हा कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केला. त्यातील ७० शिक्षकांनी हा कोर्स अधिक कौशल्यपूर्वक पूर्ण केल्याने ह्या शिक्षकांना नाशिक जिल्हा शिक्षण विभाग व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नाशिक यांच्या माध्यमातून ॲमेझाॅन फ्युचर इंजिनिअरींगने लॅपटॉप , स्मार्ट टीव्ही, टॅब्लेट अशी प्रोत्साहनपर बक्षिसे दिली. त्यात हिंदूहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे विद्याप्रबोधिनी मनपा शाळा क्र.७१, रायगड चौक सिडको शाळेच्या शिक्षिका रुपाली ठोक यांनी सदर कोर्स अधिक कौशल्यपूर्वक पूर्ण केल्याने त्यांना शाळेसाठी खास ४३ इंची स्मार्ट टि.व्हि. बक्षिस देऊन गौरविण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आमिषा मित्तल व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल गौतम याच्या शुभहस्ते संपन्न झाला. शाळेला बक्षिस मिळवल्याने शिक्षिका रुपाली ठोक यांचा नुकताच शाळेत सत्कार करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते, शिक्षक किसन काळे, विनोद मेणे, शोभा मगर, प्रमिला देवरे, कविता वडघुले, सुवर्णा थोरात, शैलजा भागवत, वर्षा सुंठवाल, किर्तीमाला भोळे, सुनिता धांडे, योगिता खैरे, प्रविण गायकवाड यांनी तसेच पालकांनी कौतुक केले.












