Home Breaking News आमदार सुहास अण्णा कांदे संस्थापक अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा रक्षक व माथाडी...

आमदार सुहास अण्णा कांदे संस्थापक अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा रक्षक व माथाडी कामगार विकास सेनेची मनमाड येथे उद्घाटन

0

मनमाड : आमदार सुहास अण्णा कांदे संस्थापक अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा रक्षक व माथाडी कामगार विकास सेनेची मनमाड येथे उद्घाटन झाले.भारतीय खाते निगम FCI मनमाड येथे महाराष्ट्र सुरक्षा रक्षक व माथाडी कामगार विकास सेनेचे उद्घाटन करण्यात आले.माथाडी कामगारांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असणाऱ्या या संघटनेत येथील मोठ्या संख्येने कामगारांनी सभासद नोंदणी केली आहे.याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष श्री सुनील जाधव सरचिटणीस श्री रवींद्र देवरे, राजाभाऊ भाबड, तसेच शहर प्रमुख मयुर भाऊ बोरसे यांनी कामगारांना मार्गदर्शन केले. यामध्ये कामगारांचे वेतन तसेच विविध हक्क व अडचणी यावर मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, युवासेना शहरप्रमुख योगेश इमले, मिलिंद उबाळे,आझाद पठाण,किशोर लहाने,अंकुश कातकडे, सुभाष माळवतकर,आजू शेख,सिध्दार्थ छाजेड,अजिंक्य साळी, विशाल सुरवसे, लोकेश साबळे,रुशिकांत आव्हाड,ललित रसाळ,बंटी आव्हाड,प्रमोद राणा,सचिन दरगुडे, कुणाल विसापुरकर,प्रसिद्धीप्रमुख निलेश व्यवहारे. शिवसेना महिल आघडी शहरप्रमुख संगीताताई बागुल, विधान सभा संघटक पूजाताई छाजेड, सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here