Home Breaking News शेवगाव-पाथर्डीचा आमदार आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा बी.आर.एस.चा असेल – माणिकराव कदम

शेवगाव-पाथर्डीचा आमदार आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा बी.आर.एस.चा असेल – माणिकराव कदम

0

अहमदनगर :  (सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा) २२२ शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघातील आमदार आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा भारत राष्ट्र समितीचा असेल असे उदगार (brs)च्या शेतकरी किसान संघाचे महाराष्ट्रराज्य अध्यक्ष माणिकराव कदम यांनी काढले ते अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे झालेल्या भारत राष्ट्र समितीच्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र राज्याचे समन्वयक दशरथ सावंत हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे युवा नेते बाळासाहेब सानप हे होते. कदम पुढे म्हणाले की या मतदार संघाचे मुख्य समन्वयक संदिप राजळे यांनी पाच हजार सभासदाची नोंदणी केली असून अजूनही वीस हजार सभासदाची नोंदणी करण्यात येणार आहे. प्रस्थापित पुढाऱ्यांच्या गलिच्छ राजकारणाला महाराष्ट्र राज्यातील जनता पुर्ण पणे वैतागली असुन लोकांना आता भारत राष्ट्र समितीच्या रुपाने नवीन पर्याय निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात प्रत्येक मतदार संघात हजारो कार्यकर्ते या पक्षाला जोडले गेले आहेत. त्यामुळे या पक्षाला निश्चितच चांगले भवितव्य आहे असे कदम यांनी सांगितले. राज्य समन्वयक दशरथ सावंत यांनी जिल्ह्यातील साखर सम्राट यांच्या साखर कारखान्यातील गैर कारभारावर जोरदार टीका केली. तर बाळासाहेब सानप यांनी भगवान महासंघाच्या सर्व कार्यकर्त्यांनी बी.आर.एस.पक्षाचेच काम करावे असे जाहीर आवाहन केले. याप्रसंगी शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघाचे मुख्य समन्वयक संदिप राजळे यांनी संपूर्ण मतदार संघाचा दौरा पुर्ण केला असुन दुसरी फेरी सुरु करण्यात आली असल्याचे सांगितले. युवा नेते पप्पू केदार, अँड.जगन्नाथ घुगे,राहुरी चे समन्वयक विवेक मोरे,नेवाशाचे समन्वयक ओंकार बडाख,अमोल जाधव,बाळासाहेब काळपुंड,अमोल आव्हाड, मोहनराव काळपुंड,सरपंच प्रकाश मगर,सरपंच गोरक्षनाथ केदार, शरद शिरसाठ, अल्ताब शेख,महादेव जवरे,राजेंद्र केदार,अमोल विघ्ने, संपत ढाकणे, विश्वास मोहीते, अशोक जायभाय,अशोक लोंढे,भागवत अकाळे,क्रुष्णा पांचाळ, सुरेश नागरे यांच्या सह शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघातील अनेक कार्यकर्ते उपस्थिती होते. (प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here