देवळा : सशक्त महिला समृद्ध भारत
माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारची सुशासन आणि गरीब कल्याणाची 9 वर्षे यशस्वीपणे पूर्ण झाले आहेत या निमित्ताने देवळा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबिर संपन्न.यावेळी केंद्र व राज्याच्या विविध लाभाच्या योजनांमुळे महिला सक्षमीकरण होत असून समस्त महिलावर्गाला सम्मान मिळवून देण्यासाठी राज्य व केंद्रसरकार पारदर्शक काम करत आहे. यामुळे राष्ट्राची वाटचाल महासत्तेच्या दिशने होत असल्याचे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी केले.केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले की देशाच्या विकासात स्त्रीशक्तीचा वाटा मोठा आहे. त्यामुळे महिलांनी एकमेकांशी सहकार्य भावना ठेवत विकासमार्ग प्रशस्त करावा केले.आमदार डॉ.राहुल आहेर यांनीही मनोगत व्यक्त करत महिलांनी राष्ट्र उभारणीसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.यावेळी गोव्याचे खासदार विनय तेंडुलकर, भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी,माजी मंत्री व आमदार जयकुमार रावल, भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर ,सुनील बच्छाव, नगराध्यक्षा सुलभा आहेर, जितेंद्र आहेर, तहसीलदार विजय सूर्यवंशी, गटविकास अधिकारी राजेंद्र देशमुख, बालविकास प्रकल्प अधिकारी जयश्री नाईक, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुधीर पाटील, गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव, मुख्याधिकारी श्यामकांत जाधव यांच्यासह इतर विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.शासकीय योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थी महिला व बचतगटांना यावेळी धनादेश, बेबीकिट, सायकल, गोल्डनकार्ड, प्रमाणपत्र तसेच इतर साहित्याचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. भाजप पदाधिकारी भास्कर पवार, अतुल पवार, योगेशनानु आहेर, मनोज आहेर, हर्षद मोरे, भाऊसाहेब आहेर, रुपाली देवरे यांनी तसेच तालुक्याच्या सर्व विभागातील अधिकारी व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.









