मुंबई. विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी येत्या 21 मे रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि भाजपने आपले उमेदवार जाहीर केले होते. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपले दोन उमेदवार जाहीर केले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करून माहिती दिली.
राष्ट्रवादीकडून विधान परिषदेच्या दोन जागांसाठी साताऱ्यातील शशिकांत शिंदे आणि अकोल्यातील अमोल मिटकरी यांच्या नावाची घोषणा झाली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटरवरुन दोन्ही उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यांनी ट्वीट केले की, ‘शशिकांत शिंदे (सातारा) व अमोल मिटकरी (अकोला) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार असतील. हे दोन्ही उमेदवार यशस्वी होऊन विधान परिषदेत उत्तम कामगिरी बजावतील याची मला खात्री आहे.’